Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»नापाक कारवाया.. भारताच्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न
    राष्ट्रीय

    नापाक कारवाया.. भारताच्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारत पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत आहे. तरीही पाकिस्तान नापाक कारवाया करत आहे. भारतावर हल्ला करण्याची पाकिस्तानचा मोठा प्रयत्न निष्फळ झाला आहे. भारतानं दिलेल्या उत्तरामध्ये पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पाकिस्तानकडून भारतामधील 15   शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता. पण, भारतानं तो प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतानं उत्तर देताना केलेल्या कारवाईत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे नष्ट केली आहे.

    https://x.com/ANI/status/1920406305354789197

     

    15 शहरांवर हल्ला

    अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपुर्तला, जालंधर, लुधियाना, उधमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, पालोडी, उत्तरलाई, भूज. या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता. तो प्रयत्न भारतानं हाणून पाडला आहे.

    एनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी भारतीय सशस्त्र दलानं पाकिस्तानचे अनेक ठिकाणं तसंच एअर डिफेन्स रडार आणि सिस्टमनं लक्ष्य केलं. पाकिस्ताननं केलेल्या प्रयत्नाला भारतानं चोख उत्तर दिलं. लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे निष्प्रभ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर  मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू ठेवला आहे. पाकिस्तानी गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निरपराध लोकांचा बळी ही गेला आहे.  पाकिस्तान गोळीबारासह तोफांचा ही मारा सीमेवर करत आहेत. काल रात्री, भारतीय हवाई दलाच्या एस-400  सुदर्शन चक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने, भारताच्या दिशेने पाकिस्तानने सोडलेल्या मिसाईलवर गोळीबार केला. या कारवाईत मिसाईल निष्प्रभ करण्यात आले आहे. एएनआयला ही माहिती मिळाली आहे. त्याला अधिकृत सरकारी दुजोरा मिळणे बाकी आहे.

    India pakistan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्ली हॉटेलच्या आगीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त

    June 4, 2026

    ठरले! ‘या’ तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

    June 4, 2026

    राजधानी दिल्ली हादरली : हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव!

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif