Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन!
    जळगाव

    माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन!

    कवि किरण येले यांचे गौरवोद्गार : बहिणाई स्मृति संग्रहालयात ‘बहिणाईंचे भावविश्व’ कार्यक्रम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 24, 2026No Comments26 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    कान्हदेशच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्या सहज, बोलीभाषेतील कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे चिंतन करणारा ‘बहिणाईंचे भावविश्व’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बहिणाबाई चौधरी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक, कवि व नाटककार किरण येले, अध्यक्ष म्हणून विठ्ठल मंदिर संस्थानचे विलास हरी चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कवि अशोक कोतवाल, सुभाष मराठे, विजय जैन, देवेंद्र पाटील, मू. जे. महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख विद्या व्यवहारे, प्रा. डॉ. योगेश महाले, विलास धनवे, डॉ. पुरुषोत्तम महाजन, प्रा. वर्षा उपाध्ये, का. ऊ. कोल्हे विद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. कोल्हे, जी. बी. पवार, चित्रा नारखेडे, मनिषा चौधरी, किशोर जाधव, चित्रकार विजय मोहन भाटिया, विशाखा देशमुख, हर्षल पाटील उपस्थित होते.

    उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. चौधरी परिवारातील सदस्य शोभा, वैशाली, निलिमा, लक्ष्मी, सुनंदा, किरण चौधरी, श्रीधर चौधरी, दिलीप चौधरी यांच्यासह कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला ‘माह्यी माय सरसोती’ ही सामूहिक कविता मू.जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. त्याचबरोबर रूपाली माळी (माझी मुक्ताई), प्राची शेरे (अरे संसार संसार) या विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या काव्यरचना सादर केल्या. उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

    कवी किरण येले यांनी बहिणाईंचे भावविश्व यावेळी उलगडून दाखविले. बहिणाबाईंच्या साहित्याचा संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या विचारपरंपरेशी संबंध जोडत, “बहिणाबाई केवळ स्त्री कवयित्री नव्हत्या; त्या समाजाचे वाचन करणाऱ्या संवेदनशील साहित्यिक होत्या. माणूस हा केंद्रबिंदू ठेवून निर्माण झालेले साहित्यच चिरंतन राहते,” असे त्यांनी प्रतिपादन केले.

    बहिणाबाईंच्या साहित्याचा अनुभव सांगताना संग्रहालयात आल्यावर “मंदिरात आल्याचे समाधान”व्यक्त केले. बहिणाबाईंच्या कवितेत शेती, निसर्ग, कष्ट, संसार, नाती आणि सामान्य माणसाच्या जगण्याचे गहिरे तत्त्वज्ञान सामावले आहे. दगडामध्ये देव दिसण्याची भारतीय संस्कृतीतील भावना, माणसामाणसांतील नाती आणि त्यातील भावबंध यांचा संदर्भ देत त्यांनी नात्यांकडे केवळ जोडणे-तोडणे या व्यवहाराच्या दृष्टीने न पाहता त्यातील संवेदना जपण्याची गरज व्यक्त केली. ‘हम्प्टी-डम्प्टी’प्रमाणे नाती जोडली आणि तोडली म्हणजे त्याला खरे नाते म्हणता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

    “ओठ आणि पोट भरण्यापलीकडे मन भरले पाहिजे,” असे सांगताना निसर्गाशी असलेले मानवी नाते आणि गुलमोहराच्या झाडाचे प्रतीकात्मक महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. कबीर, तुकाराम आणि बहिणाबाई यांनी समाजाकडे केवळ पाहिले नाही, तर समाजाचे अंतरंग अनुभवले आणि ते आपल्या शब्दांतून व्यक्त केले. आपणही जे समजतो, अनुभवतो आणि जगतो, ते कविता, लेखन अथवा सर्जनशील माध्यमातून व्यक्त केले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांच्या कवितांचे सुद्धा विश्लेषण केले.

    गिरीष कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कान्हादेशच्या साहित्य-संस्कृतीचे जतन, बहिणाबाईंच्या साहित्याचे निरंतर जागरण आणि त्यांचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने ‘बहिणाईंचे भावविश्व’ आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच बहिणाई आणि महात्मा गांधी यांच्या भेटीचे वर्णन सांगितले. यशस्वितेसाठी सुनील तायडे, ज्ञानेश्वर सोनार, प्रदीप पाटील, शरद धनगर, समाधान महाजन, अमोल भोलाणकर, विवेक व हितेंद्र चौधरी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. प्रा. गोपीचंद धनगर यांनी सूत्रसंचालन केले. गिरीष कुलकर्णी यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif