Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»शाळेत फक्त ९ विद्यार्थी, नामफलकही अस्तित्वात नाही
    शैक्षणिक

    शाळेत फक्त ९ विद्यार्थी, नामफलकही अस्तित्वात नाही

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 20, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    शेंदुर्णी ता. जामनेर

    येथील अतिशय जुनी असलेली मराठी मुलांची शाळा आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे असंख्य विद्यार्थी याच शाळेत आपले प्राथमिक शिक्षण याच दगडी शाळेत घेतले आहे. आज मात्र या शाळेची प्रचंड दुरावस्था झाली असुन काही वर्गखोल्या फक्त सुस्थितीत आहे. उर्वरित खोल्या पडलेल्या असुन पहिले ते चौथीच्या वर्गात फक्त ९ विद्यार्थी व दोन शिक्षक आहे.

    अतिशय जुनी असलेली हा जिल्हा परिषदेची मराठी मुलांची शाळा आज मात्र ‘ही शाळा आहे’ असं दर्शविणारा नामफलक सुद्धा गायब झाला आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी फक्त आता ही शाळा गजबजलेली असते. अन्य दिवशी मात्र येथे सन्नाटाच असतो. शाळेचे पुढचे गेट शाळा बंद झाल्यावर बंद होते खरं मात्र दुसऱ्या मार्गाने शाळेत बिनधास्तपणे अनेक जण “शाळा” करण्यात धन्यता मानतात. डुकरे, कुत्रे, गुर ढोरं याच मुक्त संचार या ठिकाणी असतो, प्रेम चाळे करणाऱ्या लोकांना दिवसा व रात्री हे हक्काचे ठिकाण ठरतंय. दारु, गांजा पिणारे या ठिकाणी हमखास असतात. या शाळेकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधी यांचे लक्ष आहे.

    मराठी भाषेला जागतिक भाषेचा दर्जा मिळाला ही आनंददाची व अभिमानाची बाब आहे मात्र आज मराठी जिल्हा परिषद शाळांची ही अवस्था खरच प्रशासन लोकप्रतिनिधी आणि पालकांना सुद्धा विचार करायला लावणारी बाब आहे.

     

    जन्म दाखले, जुन्या नोंदीचे रजिस्टर गायब

    या शाळेची दुरावस्था जशी आहे तशीच अवस्था जुने दाखले, नोंदी असलेले काही रजिस्टर सोडले तर बहुतांश रजिस्टर शाळेतुन गायबच झाले असुन किती तरी वर्ष झाली ते आढळ होत नाही. जातीचे दाखले, जन्म दाखले, वडील, आजोबा यांचे दाखले काढण्यासाठी आलेल्या लोकांना मात्र आल्या पावली परत जाण्याशिवाय पर्याय नाही. व्हेलीडीटी, कास्ट सर्टिफिकेट साठी हवे असलेल्या जुन्या नोंदी या शाळेत मिळणं मुश्किल झाले आहे कारण बहुतेक रजिस्टर गायब झाले आहे तर चार पाच रजिस्टर यांची तर अक्षरशः चाळणी झाली असुन काही रजिस्टर फक्त सुस्थितीत आहे. या ठिकाणी बहुतेक वेळा कागदपत्रे न मिळाल्याने वाद विवाद निर्माण होत असतात मात्र विद्यमान मुख्याध्यापक यांनी पदभार स्वीकारण्याच्या आधीपासूनच ही रजिस्टर गायब आहे.

    #students #teachers illegal activities poor condition Shendurni Zilla Parishad Marathi Children's School
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नीट परीक्षा 2026 ची परीक्षा अचानक रद्द!

    May 12, 2026

    रायसोनी महाविद्यालयात रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

    May 3, 2026

    शिक्षणाच्या नावाखाली लूट खपवून घेणार नाही : नगरसेवक अनिल पडोळे

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif