ऑनलाईन फ्रॉड; यु-ट्यूब सबस्क्रीप्शनचे आमिष दाखवून तब्बल ३ लाखांचा गंडा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

ऑनलाइन फसविणाचे (Online fraud) काम सद्याचा घडीला सऱ्हास सुरू असून जळगाव (Jalgaon) शहरात सुद्धा पैसे देण्याच्या आमिषावरून एका व्यक्तीला फसविण्यात आले आहे. शहरातील भोईटे नगर येथील रेल्वे कर्मचाऱ्याला यु-ट्यूब सबस्क्रीप्शनवर ५० व १५० रुपयाचे आमिष देत तब्बल २ लाख ९४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे.

मनोजकुमार सुनहरीलाल राज यांना सोमवारी दि ८ मे रोजी एका अनोळखी क्रमांकारून व्हॉट्सॲपवर मेसेज आला. त्यात त्यांना सांगण्यात आले यु-ट्यूब (YouTube) लिकांवर सबस्क्रीप्शन केल्यास प्रत्येकी ५० ते १५० प्राप्त होतील, त्यानंतर लिंक वर सबस्क्रिप्शन केले, व चोरट्याने टेलिग्रामच्या आयडीवर ग्रुप जॉईन करून घेतला. सांगितल्याप्रमाणे सबस्क्रिप्शन मनोजकुमार यांनी केले, पैसे सुद्धा मिळाले. नंतर वळली करणे सांगून मणिजकुमार यांच्याकडून सुमारे ९४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनोजकुमार यांनी मंगळवारी दि १६. रात्री ११ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाढ अधिक तपस करत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.