लोकशाही संपादकीय लेख

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान 24 रुपये भाव मिळावा म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने नाशिक व चांदवड मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्ता जाम केल्याने राष्ट्रवादीचे रोहित पवार, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांना पोलिसांनी पकडून फरपटत नेले. परंतु आंदोलनात शेतकऱ्यांबरोबरच राजकीय कार्यकर्ते सामील झाले होते. आंदोलन यशस्वी झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे नाक दाबले की तोंड उघडते, म्हणतात तशातला प्रकार म्हणता येईल. कांदा उत्पादकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार आहे. तेथे कृषिमंत्री गृहमंत्री यांना भेटून कांद्याला भाव कसे वाढवून मिळतील याचा प्रयत्न केला जात आहे. कांदा आंदोलकांचे यश आहे की महाराष्ट्र शासनाला त्याची दखल घ्यावी लागली. या आंदोलनात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली आहे. त्यांची जी भाषणे झाली ती शेतकऱ्यांच्या अंतर्मनाला भिडणारी होती. रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ व अंबादास दानवे यांची भाषणे जोरदार झाली. कांदा आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या शेतकरी विरोधी सरकार निषेध असो अशा घोषणा दिल्या गेल्या.


