कांद्याच्या भावाने रडवले.. संतप्त शेतकऱ्याने कांदा शेतीवर फिरविला नांगर (व्हिडीओ)

1

दहिगाव ता यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथून जवळच असलेल्या विरावली येथील शेतकऱ्याने कांदा पिक कमी उत्पादित झाल्याने तसेच भाव घसरल्याने दोन एकर शेतीवर नागरटी करून कांदा फेकला.

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे शासनावर शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. विरावली दहेगाव रस्त्यालगत विरावली शिवारातील विरावली येथील निळकंठ सदाशिव पाटील या शेतकऱ्याने कांदा उत्पादन कमी होत असल्याने तसेच कांद्याचे भाव घसरल्याने आज दोन एकर कांद्याच्या शेतीवर नागर फिरवला व ढसाढसा रडला.

सर्वसामान्य शेतकरी कांद्याचे भाव घसरल्याने वैतागले आहेत. तसेच घेतलेले कर्ज यात भेटू शकत नाही. एक एकर शेतीला 35 ते 40 हजार रुपये रोप खरेदी पासून तर खांदणीपर्यंत खर्च येतो आणि तो सुद्धा यात येऊ शकत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. सध्या कांद्याचा भाव  दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये पर्यंत आहे.

एवढा कमी भाव शेतकऱ्याला परवडत नसल्याने शेवटी शेतकऱ्याने दोन एकर शेतीवर नागर फिरून कांदा फेकून दिला. यावेळी तो ढसा ढसा रडला. या प्रकाराने कांदा उत्पादक वैतागले आहेत. सावकाराचे व संस्थांचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

1 Comment
  1. Dipak Chavan says

    सरकार ला लाज वाटली पाहिजे पुर्ण जगाचा पोशिंदा आहे शेतकरी आणि त्याच्यावर जर असा वेळ येत असेल तर हमीभाव ठरवा ना म्हणून तर शेतकरी आत्माहत्या करतात

Leave A Reply

Your email address will not be published.