Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»एक फोन अन् राज्यातील राजकारण ढवळले!
    राजकारण

    एक फोन अन् राज्यातील राजकारण ढवळले!

    निवडणुकीची धामधूम सुरू असतांनाचा धक्का?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 4, 2026No Comments813 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकूण सतरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. परंतु यावेळी महायुती आणि माहविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे. बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत बंडखोरांशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही जागांवर यशही आले आहे.

    महायुतीला रायगड, ठाणे येथील निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे. दरम्यान, आता एकीकडे विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदार शरद पवार यांना तडकाफडकी फोन कॉल केला आहे.

    पुणे विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक ही आता बिनविरोध झाली आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी स्वत: शरद पवार यांनी श्रीकांत पाटील यांना फोन कॉल केला. श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी थेट शरद पवार यांना फोन कॉलद्वारे आपण आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा, अशी मागणी केली. या फोन कॉलनंतर शरद पवार यांनीच श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. श्रीकांत पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता पुण्याची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे.

    पुण्याच्या जागेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला होता. श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता होती. हीच शक्यता टाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना फोन कॉल केला. काकडे यांनीदेखील शरद पवार यांच्याकडे अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif