मुंबई
देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सोन्या आणि चांदीचे दर वेगळे असतात. करांशिवाय राज्यातील इतर गोष्टींमुळेही सोने-चांदीच्या किंमतीवर परिणाम होतो ज्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीही राज्यांनुसार बदलतात मात्र, आता देशात मोठा बदल होणार आहे. देशात लवकरच ‘वन नेशन वन रेट’ धोरण लागू होणार असून याची अंमलबजावणी झाल्यानंतर संपूर्ण देशात सोन्याचे दर सारखेच असतील.
देशभरातील बहुतांश आघाडीच्या सराफांनी (ज्वेलर्स) ‘वन नेशन, वन रेट’ धोरणासाठी संमती दर्शवली असून जेम अँड ज्वेलरी कौन्सिलने पाठिंबा दिलेल्या या उपक्रमाचा उद्देश देशभरातील सोन्याच्या किमती प्रमाणित करण्याचा आहे. जेम अँड ज्वेलरी कौन्सिलने देशभरात एकच सोन्याचा दर लागू करण्याबाबत भारतातील आघाडीचे ज्वेलर्स एकमत आहेत मात्र, यासंदर्भातील अधिकृत घोषणा सप्टेंबरच्या बैठकीत होऊ शकते.
असा आहे वन नेशन, वन रेट पॉलिसीचा फायदा
‘वन नेशन वन रेट’ पॉलिसी ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर मानली जात आहे. यामुळे सोन्याचा एकच दर सुनिश्चित केला जाईल जेणेकरून सर्व ग्राहकांना एकाच दराने सोने खरेदी करता येतील. याशिवा संपूर्ण देशात सोन्याचा दर एकच लागू झाल्यास यामुळे बाजारपेठ आणखी चांगली होईल. याशिवाय सोन्याच्या एकच किंमती देशभर लागू झाल्यास सोन्याचे भावही खाली येऊ शकतात ज्यामुळे सराफांमध्ये योग्य स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. त्याचवेळी सोन्यासाठी मनमानी दर आकारणाऱ्या ज्वेलर्सवरही अंकुश ठेवण्यात मदत होईल. सराफा बाजाराकडून सुरू होणारा हा उपक्रम देशातील अधिक पारदर्शक आणि न्याय्य सोन्याच्या बाजाराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अद्याप ही योजना लागू करण्याची कोणतीही घोषणा करण्याची योजना नसली तरी या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सुवर्ण उद्योग नवनवीन योजना आखत आहे. केंद्र सरकार देशभरात सोन्याच्या एकसमान किंमती लागू करायचे आहे जेणेकरून सर्वांना एकसमान दरांनी सोन्याचे दागिने खरेदी करता येतील. तर सध्याच्या व्यवस्थेनुसार देशभरातील सोन्याच्या दरात तफावत असून वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर कमी-अधिक आढळून येतात. सध्याच्या काळात सोन्याच्या किंमतीत देशभरात फारसा फरक नसला तरी किमान शंभर ते 500 रुपये तफावत आढळून येते.