भोकरबारी धरणात बुडून एकाचा मृत्यू

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच धरणात ही मुबलक पाणी आले आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे. कोणीही नदी किंवा धरणक्षेत्रात जाऊ नये परंतु काही उत्साही तरुण प्रशासनाच्या आव्हाना कडे दुर्लक्ष करतात. व नद्या तसेच धरणक्षेत्रात जातात. आणि हे त्यांच्या अंगाशी येते.

अशीच घटना पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारोळा शहरातील तरूण भोकरबारी धरणाकडे गेला आणि आपला जीव गमावून बसला. पारोळा शहरातील आशिष नारायण शिंपी (३०, न्हावी गल्ली.पारोळा) हा सकाळी ११ वाजता घरी काही न सांगता निघून गेला होता. दुपारपर्यंत मुलगा घरी न आल्याने त्याचा आई वडिलांनी इकडे तिकडे शोधा घेतला. परंतु तो आढळून आला नाही सांयकाळी सहा वाजता भोकरबारी धरणाच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पारोळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.