Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»एकीकडे साधेपणाचा सल्ला दुसरीकडे अलिशान लग्न
    ताज्या बातम्या

    एकीकडे साधेपणाचा सल्ला दुसरीकडे अलिशान लग्न

    इंदोरीकर महाराजांनी केला शब्द खरा : आज शाही विवाह
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 3, 2026No Comments763 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा आज 3 मे 2026 रोजी विवाह आहे. ज्ञानेश्वरी हिचे साहिल चिलप याच्यासोबत लग्न होत आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा अत्यंत थाटात झाला. साखरपुड्यात महाराजांनी पैशांची ज्या पद्धतीने उधळण केली, त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली.

    मात्र, या टीकेला न जुमानता इंदोरीकर महाराजांनी लेकीचे लग्नही शाही पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 100 एकरमध्ये आलिशान पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्याचन काही फोटोही व्हायरल होत आहेत. मुलीच्या शाही साखरपुड्यानंतर आता लग्नही शाही होणार आहे, हे स्पष्टच आहे. जोरदार टीका इंदोरीकर महाराज यांच्यावर होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही विवाहसोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

    इंदोरीकर महाराज त्यांच्या किर्तनात साधे लग्न करण्याचा सल्ला कायमच देतात. फक्त हेच नाही तर सध्या ज्या पद्धतीने लग्नात पैशांची उधळपट्टी केली जाते, त्यावर त्यांनी नेहमीच भाष्य केले. ज्यावेळी इंदोरीकर महाराज यांनी मुलीच्या साखरपुड्यात पैशांची जी उधळपट्टी केली, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यावेळीच इंदोरीकर महाराज यांनी म्हटले होते की, काय बोंबलायचे ते बोंबला.. लग्न तर यापेक्षा जास्त जय्यत करणार.

    इंदोरीकर महाराजांनी खरोखरच त्यांचा शब्द खरा केला. साखरपुड्यापेक्षाही हा विवाहसोहळा अत्यंत आलिशान आहे. हळदीच्या कार्यक्रमाचेही खास आयोजन करण्यात आले. लग्नातील जेवणाचाही खास बेत आहे. खास पद्धतीचे डेकोरेशन लग्नात होणार आहे. राज्यातील काही मंत्रीही या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.

    गेल्या काही दिवसांपासून या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती. साधेपणा आणि मुल्यांची शिकवण देणारे इंदोरीकर महाराज मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या लग्नसोहळ्यामुळे लोकांच्या टीकेचे धनी ठरत आहेत. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचे लग्न आज सायंकाळी गुंजाळवाडी येथे होत आहे. हळदीचा समारंभ मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर येथे काल पार पडला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

    September 15, 2026

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif