Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    • नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू
    • जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३.३३ कोटीची वैद्यकीय मदत
    • आरोपीचा भररस्त्यात वाढदिवस : पोलिसांनी भरवला केक
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»एकीकडे युद्धबंदीची घोषणा; दुसरीकडे कोरिया आक्रमक
    ब्रेकिंग

    एकीकडे युद्धबंदीची घोषणा; दुसरीकडे कोरिया आक्रमक

    जगात पुन्हा खळबळ : उत्तर कोरियाने डागली मिसाइल्स
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 8, 2026No Comments459 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मध्य पूर्वेत सुरु असलेलं इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध आता कुठे शांत होतय तोच उत्तर कोरियाने एक अत्यंत आक्रमक कृती केली आहे. इराण-अमेरिका युद्धविरामाच्या घोषणेला काही तास होत नाहीत, तोच उत्तर कोरियाने बॅलेस्टिक मिसाइल्स डागली आहेत. उत्तर कोरियाने त्यांच्या पूर्व किनारपट्टीवरुन अनेक बॅलेस्टिक मिसाइल्स डागली आहेत. त्यामुळे पूर्व आशियात पुन्हा तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागताच दक्षिण कोरिया आणि जापान हे दोन देश अलर्ट मोडवर आले आहेत. उत्तर कोरियात हुकूनशाह किम जोंग उनची सत्ता आहे. उत्तर कोरियाने अनेक शॉर्ट रेंजची बॅलेस्टिक मिसाइल्स समुद्रात डागली आहेत. दोन दिवसातील ही दुसरी मिसाइल चाचणी असल्याचं दक्षिण कोरियाने म्हटलं आहे.

    पूर्व किनारपट्टीवरील शहर वोनसॅन येथून ही मिसाइल्स डागण्यात आली. उत्तर कोरियाच्या पूर्व किनारपट्टीवरील समुद्रात कोसळण्याआधी प्रत्येक मिसाइलने 240 किलोमीटरचा टप्पा गाठला अशी माहिती साऊथ कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली. आमचा जुना सहकारी अमेरिकेसोबत सन्मवय आहे. उत्तर कोरियाच्या कुठल्याही चिथावणीला जशास तस उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत असं दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटलं आहे.

    उत्तर कोरियाचं हे पाऊल धक्कादायक यासाठी आहे कारण आजच मध्य पूर्वेत सुरु असलेल्या एका युद्धात सीजफायर झाला आहे. इराण आणि अमेरिकेत सीजफायरची घोषणा झाल्याने जगाने सुटकेचा निश्वास सोडलाय. कारण कमीत कमी आता दोन आठवडे तरी तेल पुरवठा बाधित होणार नाही. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज सर्वांसाठी ओपन करण्याच्या अटीवर अमेरिका-इस्रायल या सीजफायरसाठी तयार झाले आहेत.

    युद्ध सुरु झाल्यापासूनचा आज 38 वा दिवस होता. हे युद्ध थांबत नसल्याने सर्वसामान्यांच्या घरात एलपीजी गॅस, इंधन टंचाई सुरु झालेली. महागाई वाढत होती. त्यामुळे एकाबाजूला युद्ध थांबल्याच समाधान असतानाच आज किंम जोगं उन याने मिसाइल टेस्ट केली. उत्तर कोरियाने मिसाइल डागताच दोन देश लगेच अलर्ट झाले. जपान आणि त्यांचा पारंपारिक शत्रू दक्षिण कोरिया. सुदैवाने हे मिसाइल समुद्रातच पडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

    April 15, 2026

    जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    April 15, 2026

    गावठी कट्टा, कोयत्यासह दोन तरुण अटकेत

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.