Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»ओमराजे निंबाळकर एक नामचिन गद्दार
    राजकारण

    ओमराजे निंबाळकर एक नामचिन गद्दार

    निंबाळकर यांच्यावर घणाघाती टीका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 22, 2026No Comments319 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा होता. अखेर काल ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. धाराशिवमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून अगोदर भावना जाणून घेतल्या, आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. यादरम्यान शिवसेना नेते तानाजी सावंत हे ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतच होते.

    शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यात आली. ओमराजे निंबाळकर यांनी मातोश्रीबद्दल कोणीही बोलू नका, अशीही विनंती केली. ओमराजे निंबाळकर यांनी जरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही संजय राऊत यांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली जात आहेत.

    नुकताच संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, तुम्ही ज्या ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेत आहात ते एक नामचिन गद्दार आहेत, त्यांच्यासोबतचे जे इतर गद्दार आहेत, ते देखील नामचिन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते हे मी आता ऐकले. इतिहासात जे गद्दार झाले, त्यांना काही भूमिका असू शकते का? नाही न.. जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जर कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटले पाहिजे.

    बैमान म्हटले पाहिजे… महाराष्ट्राचे शत्रू म्हटले पाहिजे. मराठी माणसाचे दुश्मन म्हटले पाहिजे. त्यांना कोणती भूमिका आहे, त्यातून तुम्ही सर्वांनी बाहेर पडले पाहिजे. शिवसेना तोडणे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणे आहे. अमित शाह ते शिंदे गटाच्या माध्यमातून करत आहेत. आम्ही ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी अजिबात केली नाही. आम्ही त्यांना वस्तूस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले, त्यांच्यासोबत वरूण सरदेसाई होते. शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या वडिलांच्या आत्माला शांती मिळणार असेल ज्यांची 20 वर्षापूर्वी हत्या झाली, तर तो त्यांचा प्रश्न आहे.

    ओमराजे निंबाळकर यांनी ज्यांच्यावर आरोप केले. ते देखील त्याच युतीमध्ये आहेत ना.. आता मांडीला मांडी लावून बसतील. हा निर्लज्जपणाचा कळस आहे आणि स्वार्थाचा शिकर आहे. या लोकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने कोणी पैसे घेतले… पहिले 15 कोटी ही सर्व माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. विकास, विकास, विकास आपण म्हणत आहात तर मराठवाड्याचा कोणता विकास भाजपाने केला? असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif