Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»“ओमराजे गद्दारी करू नका!” : कमेंटसचा पाऊस…
    राजकारण

    “ओमराजे गद्दारी करू नका!” : कमेंटसचा पाऊस…

    ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 17, 2026No Comments413 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. विशेष म्हणजे ओमराजेंना बंडखोरी करण्याच्या बदल्यात मंत्रिपद मिळणार आहे. शिवाय त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्याचं अमिषही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियातही या बंडाचे पडसाद उमटले आहेत. या बंडावर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. ओमराजे गद्दारी करू नका, अशा कमेंट नेटकरी करत आहेत. त्यामुळे ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करणार वीडियो पोस्ट केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी ओमराजे, गद्दारी करू नका, दादा गद्दारी करू नका… अशा कमेंटसचा पाऊस पाडला आहे. ओमराजेंचा व्हिडिओ येताच अवघ्या काही मिनिटातच या कमेंटचा पाऊस सुरू झाला आहे. निष्ठावंत म्हणून ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभेत राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. मात्र आता ऑपरेशन टायगरमध्ये ओमराजे यांच्या नावाची चर्चा आहे. त्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे.

    तर, ओमराजे पक्षातून फुटणार म्हटल्यावर ग्रामस्थांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामस्थांनी या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जावे, असा संताप गावकरी व्यक्त करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या पडत्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना मोठ सहकार्य केलं. आमदार केलं. खासदार केलं आणि आता ओमराजे वेगळे होत आहेत. त्यांचा निर्णय चुकीचा आहे, असं या गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याबाबतच्या चर्चा सुरू असताना ओमराजेंकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांनी आज सकाळी एक ट्विट केलं होतं. पण ते राजकीय नव्हतं. त्यामुळे ओमराजे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे ओमराजे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक भाष्य केलं आहे. ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या ड्रायव्हरची 20 वर्षापूर्वी हत्या झाली होती. त्याचा निकाल काल होता. तो निकाल पुढे ढकलला आहे. वडिलांच्या हत्येचा निकाल बाजूने लावण्यासाठी ओमराजेंवर दबाव आणला गेला आहे, असं सूचक विधान राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif