Friday, December 9, 2022

भारताला मोठा धक्का ! नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भारताला मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला  (Commonwealth Games) सुरुवात होणार आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुखापतीमुळं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर झालाय. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता (Rajeev Mehta) यांनी याबाबत माहिती दिलीय.

- Advertisement -

- Advertisement -

भारताचं प्रतिनिधित्व करणारा भालेफेकपटून नीरज चोप्रा सातत्यानं चांगली कामगिरी करून दाखवत आहे. गेल्या महिन्यात 2022 चा हंगाम सुरू करणाऱ्या नीरजनं तीन स्पर्धांमध्ये दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडलाय. त्यानं फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडून हंगामाची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं क्युर्टेन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं.

तसेच स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भाला फेकून दुसरा क्रमांक पटकावत पुन्हा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यानंतर नुकतीच पार पडलेली वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकून 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. तसेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत त्याच्याकडून भारताला मोठी अपेक्षा होती. परंतु, दुखापतीमुळं त्याला कॉमनवेल्थ स्पर्धेला मुकावं लागणार आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या