Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    • भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
    • युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार
    • शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»‘शनि काढून देतो’ म्हणत वृद्धाची फसवणूक
    गुन्हे वार्ता

    ‘शनि काढून देतो’ म्हणत वृद्धाची फसवणूक

    जळगाव बसस्थानकातील घटना : सोन्याची अंगठी व रोकड लंपास
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2026No Comments249 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    नवीन बसस्थानक परिसरात शनि काढून देतो असे सांगत एका वृद्धाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात अज्ञात दोन भोंदूंनी संगनमताने वृद्धाकडून सोन्याची अंगठी व 900 रुपयांची रोकड लंपास करून पळ काढला. ही घटना दि. 20 एप्रिल रोजी घडली असून दि. 21 एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या  माहितीनुसार,  गजानन विठोबा सर्जेराव (वय 67, रा. जिल्हा बँक कॉलनी) हे त्यांच्या मुलीकडे घरभरणीच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले होते. यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ येऊन शेगावला जाणाऱ्या बसबाबत चौकशी करू लागला. सर्जेराव यांनी माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर त्या इसमाने शेजारी बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीला एक खडा आणण्यास सांगितले. तो खडा सर्जेराव यांच्या हातात देत राम-राम तीन वेळा म्हणण्यास सांगितले. त्यानंतर बंद मूठ उघडल्यावर खड्याऐवजी रुद्राक्ष दिसल्याने सर्जेराव चकित झाले.

    या बनावाचा फायदा घेत त्या भोंदूंनी त्यांना व शेजारील व्यक्तीला बंद पोलिस चौकीजवळ नेले. तेथे दुसऱ्या व्यक्तीचे कडे काढण्यास सांगितले आणि सर्जेराव यांना त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी व खिशातील पैसे त्या व्यक्तीकडे देण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघांनाही पुढे चालत जाण्यास सांगितले. काही अंतर गेल्यानंतर सर्जेराव मागे वळून पाहतात तोपर्यंत दोन्ही भोंदू पसार झाले होते.

    आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्जेराव यांनी 21 एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजेश पदमर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026

    शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif