Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    अपघात

    बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!

    स्कूल बसजवळच कोसळला मेट्रोचा स्लॅब
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 17, 2026No Comments291 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. या मेट्रोच्या कामांमुळे आधीच वाहनचालक आणि नागरिक वाहतूककोंडीचा त्रास सहन करत आहेत. त्यातच आता सुरक्षेच्या मुद्द्यावरून भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मिरा भाईंदर परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना अचानक मेट्रोचा एक मोठा स्लॅब खाली कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

    मिरा रोड परिसरात ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी मेट्रोचा स्लॅब अचानक खाली कोसळला, त्याच वेळी खालून एक शाळकरी मुलांची बस जात होती. सुदैवाने हा स्लॅब स्कूल बसच्या अगदी जवळ पडल्यामुळे मोठा अपघात टळला आणि बसमधील शाळकरी विद्यार्थी थोडक्यात वाचले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहीसा थरार याठिकाणी पाहायला मिळाला.

    भाईंदरच्या गोल्डन नेट परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणते जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांच्या तसेच वाहन चालकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती उपाययोजना नसल्यानं मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा हे काम चालू देणार नाही असे मनसेचे नेते संदीप राणे यांनी सांगितले आहे.

    स्लॅब कोसळल्यानंतर रस्त्यावर स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं. रस्त्यावर पडलेला मलबा बाजूला कऱण्याचे काम सुरू झाले आहे. मलबा खाली पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मिरा रोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमधून आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    विशेष म्हणजे याआधीही ठाण्यातील माजिवडा परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना स्लॅब पडण्याच्या स्थितीत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता मिरा भाईंदरमध्ये थेट स्लॅबच खाली कोसळल्याने मेट्रोच्या निकृष्ट कामांवर आणि निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई आणि उपनगरांत मेट्रोचे काम करत असताना प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची ऐशीतैशी होत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif