Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    अपघात

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 6, 2026No Comments426 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पिंपरी-चिंचवड शहरातील वीजपुरवठ्यासंदर्भात एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. चिंचवड येथील ‘महापारेषण’च्या मुख्य वीज उपकेंद्रात रविवारी अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आहे.

    प्राथमिक माहितीनुसार, चिंचवड येथील महापारेषणच्या मुख्य उपकेंद्रात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे वीज यंत्रणेत प्रचंड तांत्रिक बिघाड निर्माण झाला. पुढील मोठा धोका किंवा इतर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य वीजवाहिन्यांचा पुरवठा तातडीने बंद केला आहे.

    घटनेची माहिती मिळताच महापारेषण आणि महावितरणची वरिष्ठ अधिकारी तसेच तांत्रिक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे शहरातील नागरिकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंत्रणेतील बिघाड मोठा असल्याने काम पूर्ण होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा नक्की कधी पूर्ववत होईल, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत वेळ किंवा माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. नागरिकांनी शांतता बाळगावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif