Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»बापरे! उद्ध्वस्त होण्यासाठी काही तास शिल्लक!
    ब्रेकिंग

    बापरे! उद्ध्वस्त होण्यासाठी काही तास शिल्लक!

    इराण आणि अमेरिका युद्धाचा भडका : स्थिती गंभीर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 7, 2026No Comments744 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    इराण आणि अमेरिका युद्धाचा भडका उडाला. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने युक्तपणे कारवाई करत मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यानंतर अमेरिकेने 48 तासाचा वेळ इराणला दिला. परिस्थिती अधिक घातक होत आहे. जगाकडून युद्ध थांबवण्याची मागणी होत आहे, पण युद्ध भीषण स्थितीत आहे.

    युद्धात अनेक देश होरपळत आहेत. ऊर्जेचे मोठे संकट आहे. इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि ब्रिजला टार्गेट करून मोठे हल्ले होणार आहेत. तसा इशाराही अमेरिकेने दिला. हल्ल्याची वेळ, तारीख सर्वकाही अमेरिकेने सांगितले. काही तासात इराणमध्ये विनाशाला सुरूवात होईल. मंगळवारी रात्री 8 वाजता अमेरिकेकडून इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि ब्रिजवर हल्ले होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: हल्ल्याची तारीख वेळ सर्वकाही सांगून टाकले. पण जगाची इच्छा आहे की, हे सर्वकाही टळले पाहिजे.

    डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, मंगळावारी रात्री 8 वाजता इराणवर हल्ले केले जातील. भारतीय वेळेनुसार, बुधवारी दुपारी 3.30 ला इराणवर हल्ला होईल. पूर्ण देश एका रात्रीत संपेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट रिशेअर करत झिम्बाब्वेच्या इराणी दूतावासाने म्हटले की, रात्री 8 वाजताची वेळ इतकी जास्त चांगली नाहीये.

    तुम्ही ही वेळ बदलून दुपारी 1 ते 2 च्या आसपास किंवा शक्य असेल तर रात्री 1 ते 2 च्या आसपास करू शकता? या महत्वाच्या विषयावर लक्ष ठेवण्याबद्दल धन्यवाद… असेही त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला इशारा दिला जात आहे. मात्र, इराण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अमेरिकेला देत नसल्याचे दिसत आहे. उलट त्यांच्याकडून प्लॅन बी तयार करण्यात आला.

    यासोबतच इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या आरोग्याबद्दलही विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. इस्त्रायलच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टमध्ये विविध दावे करण्यात आली. युद्ध जर भडकले तर याचे वाईट परिणाम फक्त इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेपुरतेच मर्यादित राहणार आहेत. प्रत्यक्षपणे सर्वांनाच मोठा फटका बसणार स्पष्ट आहे. सध्याच्या घडीला स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एकीकडे युद्धबंदीची घोषणा; दुसरीकडे कोरिया आक्रमक

    April 8, 2026

    इराण vs अमेरिका : अखेर ४० दिवसानंतर युद्ध विराम!

    April 8, 2026

    रूपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी..!

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.