Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बापरे.. बाप, मुरुम चोरट्यांचा शेतकऱ्याला ताप!
    ताज्या बातम्या

    बापरे.. बाप, मुरुम चोरट्यांचा शेतकऱ्याला ताप!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 12, 2025No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – शहरापासून जवळच आणि धरणगाव तालुक्यात असलेल्या फुलपाट गावाजवळ टहाकळी शिवारात एका शेतातून हजारो ब्रास मुरूम उत्खनन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे शेतकऱ्याला मनस्ताप झाला आहे. टहाकळी शिवारातील गट क्रमांक 124/2 मध्ये कैलास पंडितराव भोळे यांच्या शेतात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची आणि भरपाई मिळण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
    टहाकळी शिवारातील गट क्रमांक 124/2 मध्ये कैलास पंडितराव भोळे या शेतकऱ्याने एप्रिल महिन्यात 84 आर जमीन खरेदी केली होती. घरात मुलाचे लग्न असल्याने गेल्या तीन महिन्यात त्यांना शेतात फेरफटका मारणे शक्य झाले नाही. दि. 11 जुलै रोजी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना शेतातून पोकलॅनच्या साहाय्याने खोदकाम करीत डंपरमधून मुरूम वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
    मुरूम उत्खनन करणाऱ्यांना विचारणा केली असता सर्वांनी पळ काढला मात्र एक पोकलॅन अडवण्यात त्यांना यश आले. संपूर्ण परिसरात फेरफटका मारला असता तब्बल 3 मजली इमारत इतका खोल खड्डा खोदून मुरूम उत्खनन करण्यात आल्याचे दिसून आले. घडलेल्या प्रकाराबाबत पाळधी पोलिसांना सांगितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली अशी माहिती शेतकरी कैलास भोळे यांनी दिली.
    पोकलॅन आणि डंपर मालक याला विचारणा केली असता, तरसोद ते पाळधी बायपास महामार्गाच्या कामासाठी हा मुरूम वापरण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात 3 हजार पेक्षा अधिक हायवा भरून मुरूम वाहून नेण्यात आला आहे. महामार्गाच्या कामाचा मक्ता अग्रोह इन्फ्रा कंपनीचा असून त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी याठिकाणी मुरूम उत्खनन केल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे किंवा पावती नसल्याचे देखील तो म्हणाला.
    शेतकरी यांच्यासह अँड.कुणाल पवार यांनी देखील त्याठिकाणी पाहणी केली आणि गौणखनिज चोरीबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना ईमेल पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची आणि भरपाई मिळण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif