Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»बापरे! रोहित पवार बसले होते तिथे गोमूत्र शिंपडले!
    राजकारण

    बापरे! रोहित पवार बसले होते तिथे गोमूत्र शिंपडले!

    अन्नत्याग आंदोलनस्थळी भाजपा कार्यकर्त्यांचे धक्कादायक कृत्य
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 16, 2026Updated:June 16, 2026No Comments267 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यात आमदार रोहित पवार पंढरपूर येथे आंदोलनाला बसले होते. रोहित पवार यांनी दोन दिवस अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनादरम्यान त्यांची मुलेही आंदोलनस्थळी पोहोचले. वडिलांना अशा परिस्थितीत पाहून लेकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल सरकारकडून घेण्यात आली. मंत्री गिरीष महाराज रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले होते.

    दरम्यान अनेकांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाला नाटकबाजी म्हटले. जे लोक बीएमडब्लूमधून फिरतात, त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे काहींनी म्हटले. आता रोहित पवार ज्याठिकाणी आंदोलनाला बसले होते, तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रोहित पवार यांच्या अन्नत्याग स्थळी भाजपा कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिपडले. आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध झाल्याचा दावा माऊली हळणवर यांनी केला.

    यासोबतच जे कोणी आंदोलनात सहभागी होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशीही मागणी यादरम्यान त्यांनी केले. या आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव यांच्याकडून गोमूत्र शिपडण्यात आले. यावेळी काही घोषणा देखील देण्यात आल्या. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय झाल्याचा दावा करण्यात आला.

    या प्रकरणावर बोलताना सक्षणा सलगर यांनी बोलताना म्हटले की, मला या गोष्टीचे आर्श्चय वाटते की, अशी जी लोक आहेत, भारतीय जनता पार्टीची देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन किंवा प्रदेशाध्यक्ष त्यांनी इकडे लक्ष दिले पाहिजे. हे असे गोमूत्र शिंपडून काय सिद्ध आपण करत आहोत हे बघितले पाहिजे. थोडे नीट पेपर फुटीवर बोलावे, देशामध्ये काय चालले यावर बोलायला हवं. पण या लोकांची त्यावर बोलायची पात्रता उरलेली नाहीये.

    रोहित पवार यांनी जे आंदोलन केले ते पक्ष म्हणून नाही केलेले. हे सर्व राज्याने पाहिले. आम्हीही त्या आंदोलनात होतो. मला वाटते की, प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाहीये. शरद पवार यांचे काम सूर्याप्रमाणे आहे, कोणीही उठावे आणि काहीही बोलावे, याला महत्व नाही. हे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. कोणीही काही टिका करावी, याला महत्व नाही. सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी कोणी काम केले असेल तर ते शरद पवारांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif