Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»बापरे! जहाज बुडून तब्बल २५० जणांचा मृत्यू
    राष्ट्रीय

    बापरे! जहाज बुडून तब्बल २५० जणांचा मृत्यू

    अंदमान बेटाजवळील समुद्रात भीषण दुर्घटना
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 16, 2026No Comments728 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अंदमान बेटाजवळील समुद्रात भीषण दुर्घटना घडली आहे. अंदमान बेटाजवळील समुद्रात एक जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास अडीचशे लोकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जहाजात रोहिंग्या आणि निर्वासित बांगलादेशी नागरिकांचा समावेश होता. या भीषण घटनेने अंदमान बेटावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीती पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशच्या किनाऱ्यावरून निघालेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेले जहाज मलेशियाकडे जात असल्याचं वृत्त आहे. खवळलेल्या समुद्रात आणि वेगवान वाऱ्यामध्ये जहाज सापडलं. त्यानंतर हे जहाज ९ एप्रिल रोजी उलटल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत केवळ ९ जणांचा सुटका करण्यात यश आलं आहे. म्यानमारमधून रोहिंग्या समाजाचे हजारो लोक इतरत्र स्थलांतरित होत असतात. ही लोक म्यानमारमधील जाचाला कंटाळलेले लोक जीव धोक्यात घालून दुसऱ्या देशात जातात. स्थलांतरित लोक दुसऱ्या देशात जाण्यासाठी नेहमी एखाद्या साधारण जहाजाचा वापर करतात.

    म्यानमारच्या रखाइन राज्यातील सैन्य आणि रोहिंग्या समाजाच्या विद्रोही समूहाशी नेहमी वाद होत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, २८० लोक जहाजात होते. ४ एप्रिल रोजी बांगलादेशातून हे जहाज निघालं’. ‘UNHCR’ने स्पष्ट केलं आहे की, ही फार दु:खद घटना आहे. या समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना स्थलांतरित व्हावे लागते’. बांगलादेशच्या तटरक्षक दलाने स्पष्ट केलं आहे की, ९ एप्रिल रोजी इंडोनेशिया जवळून एका जहाजातील ९ लोकांना वाचवण्यात यश आलं. यात एका महिलेचाही समावेश आहे. बीसीजीचे प्रवक्ता लेफ्टनंट कमांडर सब्बीर आलम सुजान यांनी सांगितलं की, ‘बांगलादेशाचा ध्वज एम. टी. मेघना प्राइडने अंदमान बेटाजवळ समुद्रात काही लोक पाण्यात तरंगताना दिसले. त्यानंतर तातडीने पाण्यातून बाहेर काढले. वाचवण्यात आलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif