Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»बापरे! भारताच्या दिशेने येतंय एक मोठं संकट!
    हवामान

    बापरे! भारताच्या दिशेने येतंय एक मोठं संकट!

    ज्याची भीती तेच घडले, एल निनोचा भयंकर अंदाज
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 2, 2026No Comments1,638 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारताच्या दिशेने मोठे संकट येत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासनाच्या हवामानशास्त्रज्ञांनी एल निनोमुळे यावर्षी अटलांटिक चक्रीवादळांचा हंगाम सामान्यपेक्षा शांत राहील असा अंदाज वर्तवला आहे. या एल निनोचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. त्यामध्येच भारताच्या दिशेने हे पुढे सरकत आहे. एल निनोमुळे चक्रीवादळ सामान्यपेक्षा कमी होण्याची 55 टक्के आणि सामान्यपेक्षा जास्त होण्याची 10 टक्के शक्यता आहे. हा अत्यंत मोठा धोका आहे. या एल निनोमुळे कहर होऊ शकतो. याबाबत अगोदरच मोठा इशारा देण्यात आला. प्रशासन देखील सतर्क मोडवर आहे. अटलांटिक चक्रीवादळ जूनच्या सुरुवातीपासून 30 नोव्हेंबरपर्यंत असतो. हा त्याचा कालावधी आहे. हे वादळ जूनपेक्षा सप्टेंबर महिन्यात अधिक तीव्र होते आणि सर्व खेळखंडोबा करते.

    एल निनो म्हणजे मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात होणारी एक नियतकालिक वाढ आहे. यामुळे थेट पर्जन्यवृष्टीच्या प्रणालींमध्ये व्यत्यय येतो. याचा परिणाम पुढे असा होतो की, जगाच्या अनेक भागात पूर, दुष्काळ आणि उष्णतेची लाट येऊ शकते. यावेळी या एल निनोचा प्रभाव भारतात बघायला मिळेल. याचा मोठा फटका बसू शकतो. बऱ्याचदा एल निनो दरम्यान तापमानात मोठी वाढ होते. चक्रीवादळ किंवा उष्णता दोन्ही एल निनोमध्ये अत्यंत उद्धवस्थ करून टाकते. जर उष्णता वाढली तर दुष्काळ पडू शकतो. जर चक्रीवादळ आले तर एक थैमान घालून जाते. यंदा भारतावर थेट परिणाम एल निनोचा असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एल निनो साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी घडते. दरवर्षीच एल निनो होते, असे अजिबातच नाही.

    धक्कादायक म्हणजे एल निनो तब्बल 9 महिने ते 12 महिने टिकते. ला निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील सामान्यपेक्षा थंड तापमान. एल निनो दरम्यान वारे कमकुवत होते किंवा त्यांची दिशा बदलते. एल निनोचा भारतावर थेट परिणाम होईल. यामुळे उन्हाळा अधिक काळ टीकेल. किंवा पावसाळ्यात सामान्यापेक्षा खूप जास्त पाऊस होईल. याचा थेट भारताच्या शेतीवर परिणाम होईल. अति पाऊल झाला किंवा अती उन्हाळा पडला तरीही त्याचा परिणाम शेतीवर होईल. यामुळे अन्नधान्याच्या किमतीही वाढू शकतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif