लोकशाही न्यूज नेटवर्क
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे टेन्शन वाढले आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. राज्यातील महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी बंधनकारक केल्याने लाभार्थी संख्येत 86 लाखांची मोठी घट झाली आहे. तांत्रिक चुका आणि कठोर छाननीमुळे 2 कोटीं 40 लाख पैकी केवळ 1 कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळालाय. राज्यावरील वाढते कर्ज आणि निधीचा तुटवडा यामुळे जानेवारीचे मानधन रखडले असून, पात्र महिलांना आता 31 मार्चपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.

