Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»गुगलवर अहिराणी बोलीला अधिकृत मान्यता!
    जळगाव

    गुगलवर अहिराणी बोलीला अधिकृत मान्यता!

    खान्देश वासियांमध्ये आनंद : जागतिक स्तरावर नवी ओळख
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 26, 2026No Comments200 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    खान्देशची ओळख असलेल्या अहिराणी बोलीला आता जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून, गुगलने अहिराणी भाषेला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अहिराणी भाषा गुगल कीबोर्डवर सहज टाईप करता येणार असून, डिजिटल माध्यमातही या मायबोलीचे स्थान निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे खान्देशवासीयांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    अहिराणी ही फक्त बोली नसून खान्देशच्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि परंपरेचा आत्मा मानली जाते. गावखेड्यांतील दैनंदिन व्यवहार, लोकगीते, सण-उत्सव, नातेसंबंध आणि लोकसंस्कृती यामध्ये अहिराणीचा गोडवा आजही टिकून आहे. आता गुगलसारख्या जागतिक तंत्रज्ञान मंचावर या बोलीला स्थान मिळाल्याने तिच्या जतन आणि संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. या यशामागे जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्था, साहित्यिक, कवी, संशोधक आणि भाषा प्रेमी यांचे दीर्घकालीन प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. अनेक वर्षांपासून विविध माध्यमांतून अहिराणी भाषा जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करण्यात येत होते. गुगलवरील मान्यतेमुळे नव्या पिढीला अहिराणी भाषेशी जोडण्यास मदत होणार असून, डिजिटल युगात मायबोली अधिक सक्षमपणे पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जी भाषा टिकते, ती संस्कृती टिकते, या भावनेतून आता अहिराणी अधिक अभिमानाने बोलली, लिहिली आणि जपली जावी, अशी भावना खान्देशवासीयांकडून व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif