Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»अमराठी व्यापारी महिलेची मराठी माणसावर आक्षेपार्ह टिप्पणी
    महाराष्ट्र

    अमराठी व्यापारी महिलेची मराठी माणसावर आक्षेपार्ह टिप्पणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 4, 2025Updated:July 4, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यभरातून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. सरकारने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर एक होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यापारी महिला मराठी लोकांना धमकी देताना दिसत आहे.

    या व्हायरल व्हि़डिओची आम्ही पुष्टी करत नाही. पण हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत महिलेच्या विधानाने सर्वच आवाक् झाले आहेत. एका व्यापारी सभेतील महिलेच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. या सभेत तिने मराठी माणसांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे दोन भाषिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती खुलेआम मराठी माणसाला धमकी देताना दिसत आहे.

    काय आहे व्हिडीओ?

    व्हायरल व्हिडीओमध्ये, संबंधित महिला हिंदी भाषेत व्यापारी सभेत बोलताना दिसत आहे. ती व्यापाऱ्यांना म्हणते की, आपण दुकाने दोन-चार दिवस बंद ठेवू म्हणजे लॉकडाऊनसारखे हाल होतील मराठी माणसाचे. तिच्या या वक्तव्यानंतर सभेत उपस्थित असलेले सर्व व्यापारी टाळ्यांचा कडकडाट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ यूट्यूब शॉर्ट्सवर अपलोड झाल्यापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. ‘बाई तुझी दुकानं खुशाल बंद करुन जा… मरु देत आम्हाला उपाशी’ अशा शब्दात नेटकऱ्यांनी या बाईला सुनावले आहे.

    अमराठी व्यापाऱ्यांची एक सभा पार पडली. त्यातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातं. पण तो कधीचा आहे याची पुष्टी होऊ शकलेली नाही. सूत्रांनुसार, सभेत स्थानिक व्यापारी धोरणे आणि बाजारातील स्पर्धा यावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान, संबंधित महिलेने हिंदी भाषेच्या वादावरुन आक्षेपार्ह टिप्पणी केली. तिच्या वक्तव्याचा संदर्भ नेमका काय होता, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, तिच्या धमकीच्या स्वरूपामुळे मराठी समुदायात संतापाची लाट पसरली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2025/07/videoplayback.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif