आरोग्यदाई तुळस

0

 लोकशाही विशेष लेख

 

शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम
आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुर्‍यासारख्या फुलानां मंजिरी म्हणतात. त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत मानाचे आणि पवित्र स्थान दिले आहे. अनेक व्याधी आणि समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये तुळशीचा वापर सांगितला आहे. त्यातील आरोग्यदायी घटक मन शांत करण्यासाठी तसेच ताण-तणाव कमी करण्यास मदत करतात.

 

तुळशीमध्ये शरीरातील स्ट्रेस हार्मोन (कॉर्टिसोल) नियंत्रित करण्याची क्षमता आहे. ताण -तणावामुळे मेंदूचे होणारे नुकसान टाळण्यासही मदत होते. तुळशीच्या पानांमध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट्सचा (Antioxidants) मुबलक साठा आढळतो. परिणामी शरिरातील फ्री रॅडिकल्सचा (Free radicals) प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य राखण्यास मदत होते. तुळशीमध्ये अ‍ॅडप्टोजेनिक (Adaptogenic) क्षमता असते. त्यामुळे रक्ताभिसरणाच्या कार्यात सुधारणा होते. नर्व्हस शांत होतात. परिणामी ताण कमी होण्यास मदत होते. शरीरात ताणतणावामुळे वाढलेले ऑक्सिडेशन कमी होते. हळूहळू ताणतणावाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम रोखण्यासही मदत होते. तुळशीचा काढा किंवा चहामध्ये तुळशीची पानं मिसळून उकळल्यास दिवसभरातील थकवा आणि ताण कमी होण्यास मदत होते.

तुळस पाने सावलीत वाळवून वस्त्रगाळ चूर्ण करून पाच ग्रॅमच्या डब्या भराव्यात व नसच्या जागी सर्वांना द्याव्यात तुळस पावडर नाकात ओढल्याने अर्ध डोके दुखी, लकवा, सर्दी, दमा, कफ, नाकातील हाड वाढणे कमी होते. देवी रोग साथ गावात येताच घरात, गावात प्रत्येक व्यक्तीला खडीसाखर, तुळसीचा रस पाणी टाकून दररोज ७ दिवस घेण्यास सांगावा. वात संधीवात, आमवात यासाठी तुळस रस चार चमचा, गुळ ५ ग्रॅम, मीरी पावडर २ ग्रॅम, सुंठ पावडर २ ग्रॅम, तुप २ चमचा असे मिसळून खावे ६० ते ९० दिवस घ्यावे. नियमित न चुकता निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी तुळस रस पांच थेंब अर्धी वाटी पाण्यात घ्यावा + तुळस, आद्रक यांचा रस एक-एक लिटर खडीसाखर पाक एक तारी एक लीटर परत शिजवून एक तारी करून भरणीत थंड करून भरून ठेवावा उपयोग सर्दी, खोकला, ताप व निरोगी शरीरसाठी दररोज एक चमचा खावे.

 

तुळस पानाचा रस डोक्याचे केस काढून लावल्याने व अंगठी किंवा सोन्याने हळुहळू घासावे असे केल्याने नविन केस येतात हे टक्कलासाठी आहे. बुद्धी वाढीसाठी तुळस रस एक चमचा, अर्धीवाटी पाणी मिरेपावडर वस्त्रगाळ, दोन चिमुट मुलांना, एक चिमुट खडी साखर पावडर असे एकवीस ते नव्वद दिवस घेणे. बुद्धीत वाढ होते. वेडा, मीर्गी, कॅन्सर, एड्स, वात, पित्त, कफ, हे विकार जाऊन शरीर निरोगी राहाते. त्वचा विकार, रिंग, वात, खाज, लखवा, अर्धांगवायु, कोड, मुळव्याध, इसब, मुरुम यावर तुळस पाने चटणी लावावी. समान मात्रेत तुळस रस व खोबरेल तेल सिद्ध करून थंड करून गाळून ठेवावे. डोक्यांच्या केसासांठी, उवा, कोंडा, फोड, केस गळणे, पिकणे रात्री झोपतांना लावावे.

तिळ किंवा सरसो तेलात तुळस रस सिद्ध करून मालीश, खाज, इसब, वात, संधीवात यावर गुणकारी. तुळस अंगणात, दारात, छतावर, कुंडीत, शेतात, खिडकीत अशी सर्वांनी लावली पाहिजेत. कारण ऑक्सिजन देण्याचे काम तुळस करत असते. अशा ऑक्सिजन पासून व औषधीय महासागरापासून वंचीत राहून व्याधी भोगावे लागतात. अर्धांग वायू वरअर्धी वाटी गाईचे दही व अर्धी वाटी तुळस पानांची पेस्ट व ५ ग्रॅम सैंधव मिठ अर्धांगावर लेप. द्यावा खुप फरक पडतो व लसून पाकळी खावी. अर्धीवाटी गाईचे दही त्यात चार चमचा तुळस रस व दोन चिमुट मिरेपावडर टाकून घेतल्यास कॅन्सर, एड्स, सर्दी, खोकला बरे होतात. तुळस पंचाग काढा दर आठ दिवसांनी एकदा अवश्य घ्यावा निरोगी राहाल.

संतोष ढगे, सांगली
8208426494

Leave A Reply

Your email address will not be published.