Thursday, September 29, 2022

तरूणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल; तरुणावर गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव (jalgaon) शहरातील एका भागातील तरूणीसोबत प्रेमसंबंध असताना तरुणाने तिला व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल (WhatsApp Video call) करून अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर (Cyber Crime) पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील एका भागातील २२ वर्षीय तरूणीचे चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तरूणाने एकेदिवशी तरूणीला तिच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला. यात तरूणाने तरूणीला अंगावरचे संपूर्ण कपडे काढण्यास सांगितले. तरुण जसे सांगेल तसेच तरुणीने त्यास करून दाखविले. हा संपूर्ण प्रकार तरूणाने रेकॉर्ड केला व तयार अश्लील व्हिडिओ (Obscene Video) त्याच्या मित्राला व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला.

या प्रकारामुळे तरुणीची बदनामी झाली. अशी तक्रार तरुणीने मंगळवार १ मार्च रोजी जळगाव सायबर पोलिसांत दिली असून त्यावरुन तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या