पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
मानवी जीवनास घातक ठरत असलेला नायलॉन मांजाचा कुणीही वापर करू नये. कुणीही नायलॉन मांजाचा वापर करतांना आढळल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. याविषयी पालकांची ही मोठी जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या पाल्यांना नायलॉन मांजा न वापरण्याच्या सुचना द्याव्यात असे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या भेटी दरम्यान तमाम नागरिकांना दिल्या आहेत.
चालु वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी पाचोरा शहरात रसुलनगर येथुन एका महिलेस ताब्यात घेत पाचोरा पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त केल्याची कारवाई केली आहे. यासोबतच पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीत व परिसरात कुणीही नायलॉन मांजा विक्री करु नये जणेकरुन मानवी जीवनास कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.