माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीची गळफास घेत आत्महत्या

1

लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवंगत अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव (Former Chief Minister of Andhra Pradesh NTR) यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मेहुणी के उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) यांनी सोमवारी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हैदराबाद (Hyderabad) येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

माहेश्वरी यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासणीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे, असे जुबली हिल्सचे पोलिस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले.

उमा माहेश्वरी यांच्या निधनाने संपूर्ण एनटीआर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एनटीआरच्या कुटुंबातील इतर सदस्य उमा माहेश्वरी यांच्या घरी पोहोचले आहेत. चंद्राबाबू नायडूही लवकरच येणार असल्याची बातमी आहे. परदेशात उपस्थित असलेल्या ज्युनियर एनटीआर यांना उमा माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. सध्या त्यांचे पार्थिव दर्शनासाठी घरी ठेवण्यात आले आहे. यावेळी एनटीआरचे कुटुंबीय, नातेवाईक आणि अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. उमा माहेश्वरी यांच्या निधनाने अनेकजण शोक व्यक्त करत आहेत.

जुबली हिल्सचे पोलीस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण असून तपासानंतरच यामागेचे कारण समजेल. उमा या तेलगू देसम पक्ष (टीडीपी) संस्थापक एनटीआर यांच्या 12 मुलांपैकी सर्वात लहान होत्या.

 

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    फार वाईट’ , असे करामला नको होते

Leave A Reply

Your email address will not be published.