Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आता सोनमची शिक्षा अटळ ! : मिळाले तीन महत्वाचे पुरावे
    गुन्हे वार्ता

    आता सोनमची शिक्षा अटळ ! : मिळाले तीन महत्वाचे पुरावे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    इंदूरच्या राजा रघुवंशी प्रकरणात, पोलिसांना 99% पुरावे मिळाले आहेत जे सर्व आरोपींना शिक्षा करण्यासाठी पुरेसे आहेत. बुधवारी, पोलिसांनी या हत्येतील आरोपी प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्स आणि लोकेंद्र सिंग तोमर यांची सखोल चौकशी केल्यानंतर सोनमचा लॅपटॉप, पिस्तूल आणि 5 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जप्त केली. सध्या या प्रकरणात एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

    सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा हा या हत्येचा खरा सूत्रधार आहे. तर सोनमने या हत्येत त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. दोघांनी मिळून राजाला मारण्याचा कट रचला होता. या प्रकरणातील आणखी एक आरोपी विशाल उर्फ ​​विक्कीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याने सोनमच्या इंदूर येथील लपण्याच्या ठिकाणी एक काळी बॅग पोहोचवली होती, ज्यामध्ये 5 लाख रुपये, दागिने, कपडे आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल होते. हे पिस्तूल हत्येच्या प्लॅन बी चा भाग होतं, तो प्लान सोनमने अतिशय धूर्तपणे तयार केला होता.

    या हत्येत प्रॉपर्टी ब्रोकर शिलोम जेम्सचा मोठा सहभाग असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली आधीच अटक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिलोम फ्लॅटमधून एक काळी बॅग घेऊन गाडीत ठेवताना दिसला होता. ही बॅग हत्येशी संबंधित महत्त्वाच्या पुराव्यांचा खजिना होती, त्याचीच सिलोमने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

    हत्याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सोनमच्या हिराबाग येथील लपण्याच्या जागेवर, फ्लॅटवर छापा टाकला, पण तिथून बॅग गायब होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शिलोमचं नाव समोर आलं. या फ्लॅटचा मालक लोकेंद्र सिंग तोमर हासुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. हा फ्लॅटच हत्येच्या कटाचे मुख्य केंद्र होता, जिथे हत्येची योजना आखून ती राबवण्यात आली.

    मेघालय पोलिस हे राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सोनमला गाझियाबादमध्ये पकडण्यापूर्वी ती इंदूरमध्ये लपून बसली होती. कोणताही पुरावा सोडू नये म्हणून पोलिस आता प्रत्येक अँगलचा तपास करत आहेत. मेघालय पोलिसांच्या सक्रियतेमुळे हे प्रकरण अधिक रोचक बनले आहे. पोलिसांना जे काही पुरावे मिळाले आहेत, त्यावरून आरोपींना सहज शिक्षा होऊ शकते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif