‘आता ट्रिपल इंजिन सरकार!’ : अमित शहांचा इशारा कुणावर?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ढोल वाजत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील महायुतीचे शिल्पकार अमित शहा भाजपच्या नूतन कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजनाला आले आणि त्या प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषण वजा इशाऱ्याने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडवून दिली. अमित शहा यांनी पहिली ठिणगी आपल्या भाषणात टाकली ती म्हणजे भाजप हा असा पक्ष आहे, जो कुणाच्या कुबड्यांवर चालणारा नाही. याचा अर्थ महाराष्ट्रात महायुतीचे जे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाच्या कुबड्यांवर चालते आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला या दोन कुबड्या नको आहेत, असा अप्रत्यक्ष इशारा अमित शहा यांनी दिला का? या इशाऱ्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना घाम फुटला असणार एवढे मात्र निश्चित. आतापर्यंत डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव करा, जेणेकरून दुर्बिणीतूनही जरी पाहिले तरी विरोधी पक्ष नावाला शिल्लक दिसणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना हा जोरदार इशारा देऊन आगामी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल. म्हणजे ही आगामी 2019 च्या निवडणुकीचे मिशन त्यांनी घोषित केले आहे. 2024 च्या विधानसभा पूर्णपणे पारदर्शक झालेल्या नाहीत. मतांचा घोळ करून निवडणूक असल्याचा महायुतीवर जो आरोप होतो आहे, तो भाजपला आगामी 2019 च्या निवडणुकीत पूर्णपणे धुऊन काढण्याचा आहे. आणि त्यावेळी भाजपचा मुख्यमंत्री भाजपच्या स्वबळावर होईल, असेच अमित शहा यांना सांगायचे आहे. त्यामुळे जर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला कुबड्या नको असतील तर भाजपचे जे साडे सव्वीस टक्के जे वोटर शेअरिंग आहे, ते वाढविण्याची गरज आहे. म्हणजे शिंदे शिवसेनेचे 10% आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे साडेचार टक्के वोट म्हणजे एकूण पंधरा टक्के वोट भाजपला वाढवावे लागणार आहेत. तरच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल. म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कुबड्या संपवण्याच्या मार्गाने भाजप वाटचाल करत आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार मध्ये शिंदे आणि अजित पवार दोघे सरकार मध्ये असल्याने अमित शहांच्या कुबड्यांचा अर्थ म्हणजे हे दोघी नव्हे, असा पवित्रा घेऊन शिंदे, पवार महायुतीचे असल्याचे सांगून सारवासारव केली जात आहे. कारण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांपैकी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर या चार निवडणुकांमध्ये शिंदेंबरोबर युती करायची आहे. बाकी महापालिका भाजप स्वबळावर लढवणार आहे. हे स्पष्ट दिसते आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा सुपडा साफ करा, जेणेकरून दुर्बिणीच्या माध्यमातूनही पाहायचे झाले तर तो दिसणार नाही, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे वक्तव्य म्हणजे अत्यंत आतताईपणाचे आहे, एवढे मात्र निश्चित. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते महायुतीत घवघवीत यश मिळाले, याबाबत महाराष्ट्रातील जनता खुश नाही. मतदार यादीतील घोळ आणि मतदान चोरी झाल्याचा अनेक प्रकारे पुराव्यानिशी विरोधक सादर करीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जे झाले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल, हे शक्य नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मतदारांशी प्रत्यक्ष संबंध असतात. त्यांच्यातच स्थानिक पातळीवर, उदाहरणार्थ.. चाळीसगाव शहर मतदार संघातील डबल मतदान आणि बाहेरचे वाढीव मतदार मिळून मतदार यादी मधील घोळ घृष्णेश्वर पाटील यांनी नुकताच प्रोजेक्ट द्वारे पत्रकार परिषदेत दाखवून दिला आहे. 39 ते 50 हजार मतदान वाढविण्यात आले असून एक नंबरच्या त्यांच्या प्रभागात 317 डबल मतदार व बाहेरचे मतदार असल्याचे पाटील यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. शेजारच्या मालेगाव तालुक्यातील पोहणे या गावातील सरपंचांसह अनेकांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे अमित शहा यांचे वक्तव्य म्हणजे आत्मविश्वासाला तडा देणारे आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा’ अशी घोषणा केली. त्याचे काय झाले? इंदिराजींच्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. हे अमित शहा यांनी लक्षात ठेवणे आवश्यक नाही का? या प्रश्नाचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.