Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»आता थेट शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का
    राजकारण

    आता थेट शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का

    तब्बल ७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 5, 2026No Comments759 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नाशिकच्या येवला नगरपालिकेत एक अत्यंत मोठी आणि नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) च्या १० पैकी तब्बल ७ नगरसेवकांनी शिक्षक आमदार किशोर दराडे आणि शिवसेना नेते कुणाल दराडे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या बंडखोरीमुळे येवल्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आमदार किशोर दराडे यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

    या सर्व ७ नगरसेवकांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपला आपला जाहीर पाठिंबा दिला.

    “राज्यात जरी महायुतीचे घटक पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर काही मतभेद असू शकतात. मात्र, शहराच्या आणि भागाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येत आहेत, असे माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले.” “आमच्या नगरसेवकांना स्थानिक पातळीवर सातत्याने त्रास दिला जात होता. जर यापुढेही असाच त्रास दिला गेला, तर हे सातही नगरसेवक आपल्या नगरसेवकपदाचा तडकाफडकी राजीनामा देतील आणि थेट जनतेसमोर निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहेत,” असा जाहीर इशारा अमोल शिंदे (उपजिल्हाध्यक्ष, शिवसेना – शिंदे गट) यांनी दिला.

    येवला नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाकडे १० नगरसेवक होते, त्यापैकी ७ नगरसेवकांनी सामूहिकपणे हा निर्णय घेतल्यामुळे आता स्थानिक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif