नोव्हेंबर संपला! लाडक्या बहिणींचा हप्ता कधी?

बहिणी प्रतीक्षेत : डिसेंबरमध्ये एकत्र येण्याची शक्यता

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे तरीही अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात २ आणि ३ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या काळात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. दरम्यान, निवडणूकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तरी पैसे येणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे.कदाचित महिलांना दोन्ही हप्ते एकत्रितपणे दिले जाऊ शकतात. मागच्या वर्षी विधानसभा निवडणूकीपूर्वी महिलांच्या खात्यात दोन हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यानंतर आतादेखील महिलांच्या खात्यात पैसे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाईल.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी करण्यासाठी आता शेवटचा एक महिना उरला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत महिलांना केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला त्यानंतरचा हप्ता मिळणार नाहीये. त्यामुळे महिलांनी ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.