Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अट्टल मोटारसायकल चोरटा जेरबंद
    गुन्हे वार्ता

    अट्टल मोटारसायकल चोरटा जेरबंद

    आरोपीकडुन ४ मोटार सायकलसह सव्वा लाखाचा मुददेमाल जप्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 27, 2026No Comments194 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

    जळगाव जिल्हयामध्ये तसेच पाचोरा शहरात विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करणारे चोरटे सक्रीय असुन जिल्हा व पाचोरा शहरात चोरीचे गुन्हे उघड करुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी पाचोर पोलिस स्टेशनचे पो. नि. राहुलकुमार पवार यांना सुचना दिल्या होत्या.

    २७ जुलै रोजी पाचोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहन चोरीच्या गुन्हयाचा यशस्वी तपास करत चार मोटार सायकल चोरी करणा-या एका आरोपीस अटक केली आहे. आरोपीकडुन चोरी गेलेल्या चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असुन त्यांची एकुण किंमत अंदाजे १ लाख २० हजार रुपये इतकी आहे.

    वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास सुरु असतांना पाचोरा पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपी पाचोरा ते जळगाव महामार्गावरील खेडगाव (नंदीचे) येथे शेतात शेडमध्ये लपुन राहत असल्याचे माहीती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशन पथकाने सापळा रचत आरोपी अमोल राजेंद्र ढमाळे (वय – २७) रा. खेडगाव (नंदीचे) ता. पाचोरा ह. मु. काळेनगर, जळगाव यास ताब्यात घेतले असता त्याने ४ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार त्याच्या ताब्यातुन ४ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

    यातील आरोपी बजाज प्लॅटीना मॉडेल कंपनीच्या मोटार सायकल मास्टर चाबी च्या सहाय्याने चोरी करत होता. जप्त केलेल्या मोटार सायकल चोरी झाल्याबाबत खालीलप्रमाणे पाचोरा, भडगाव, एमआयडी वाळुंज (छ.संभाजीनगर) पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.

    सदर कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदिप शेवाळे, पो. उप. नि. कृष्णा घायाळ, पो. हे.कॉ. विलास पाटील, पो. हे. कॉ. श्रीकांत गायकवाड, पो. हे. कॉ. उमेश पाटील, पो. कॉ. योगेश पाटील पो. कॉ. संदीप पाटील, पो. कॉ. हरीश परदेशी यांनी केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif