Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    गुन्हे वार्ता

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    जामनेर आगारातून मध्यरात्री नवी कोरी बस लांबवली
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 10, 2026No Comments510 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव

    जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगाराची नवी कोरी जिजाऊ बस अज्ञात इसमाने मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची चर्चा सध्या जिल्ह्यात सर्वत्र सुरु आहे.

    जामनेर आगाराची एमएच 19, एनई 4214 क्रमांकाची ही बस रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता आगारातून गायब झाली. सोमवारी सकाळी ही बस शहापूर गावातील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलावर दिसली. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे बस उभी असल्याने ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले. याबाबत गावात चर्चा सुरु झाली. शहापूर गावात जामनेर आगारातील काही चालक व वाहक वास्तव्यास आहेत. फरशी पुलावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या बस बाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसची पाहणी केल्यानंतर ही बस जामनेर आगाराची असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना घटनेची माहिती दिली.

    प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने बस आगारातून बाहेर काढली. नवी कोरी बस घेऊन संशयिताने जामनेर शहरातून शहापूरच्या दिशेने प्रवास केला. मात्र, खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ बसचे पुढील चाक पंक्चर झाले. त्यानंतर बस पुढे नेता न आल्याने संशयिताने बस तेथेच सोडून दिली आणि घटनास्थळावरून पलायन केले.

    पळवून नेलेली नवी कोरी जिजाऊ बस जामनेर आगारातून जळगाव-नेरी-जळगाव या मार्गावर नियमित धावत असते. प्रवाशांच्या सेवेसाठी वापरली जाणारी बस अशा प्रकारे पळवून नेण्यात आल्याने एसटी प्रशासनातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

    मात्र जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस अशाप्रकारे चोरी झालायने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बस आगारातून बाहेर जात असताना संबंधित व्यक्तीची कुणालाही चाहूल कशी लागली नाही, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत जामनेर पोलीसांकडून आधी तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif