कबचौ उमविच्या रद्द झालेल्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षांचे वेळापत्रक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जाहीर केले आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती. यात विद्यापीठाने सोमवारचा होणाऱ्या परिक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रद्द झालेल्या परिक्षांचे वेळापत्रक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जाहीर केले असून रविवारी १३ फेब्रुवारी रोजी विविध अभ्यासक्रमांच्या परिक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे.

याबाबत संबंधित महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रसिध्दीपत्रकान्वये विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्र. संचालक प्रा. डॉ. डी.एस. दलाल यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here