Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»अर्थशास्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या : डॉ. क्लॉडिया गोल्डिन
    लोकशाही विशेष

    अर्थशास्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या : डॉ. क्लॉडिया गोल्डिन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 24, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नव दुर्गा (महिला अर्थतज्ज्ञ)

    श्रम बाजारात महिलांना वेतनापासून अनेक बाबतीत लिंगभेदाला तोंड द्यावे लागते. गर्भनिरोधक गोळीच्या शोधानंतर या बाजारपेठेत मोठे बदल झाल्याचे निरीक्षण ज्यांच्या मूलभूत दिशादर्शक संशोधनाने नोंदविले आहे. अर्थशास्रातील नारीशक्तीच्या कार्याला कबुली देणारे पहिले संशोधन करणाऱ्या अश्या आजच्या आपल्या नव दुर्गा आहेत क्लॉडिया गोल्डिन.

     

    पार्श्वभूमी :

    १९४६ मध्ये न्यूयार्क शहरात जन्म झालेल्या क्लॉडिया गोल्डिन यांना अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांच्या भूमिकेच्या क्षेत्रातील अग्रगण्य संशोधक आणि शिक्षिका म्हणून ओळखले जाते. क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील एक आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्य करत असताना त्यांनी केलेले संशोधन हे भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तनमानाचा अर्थ लावणारे आहे. त्यांनी रिअर अँड फॅमिली, अ सेंच्युरी ऑफ वुमन – द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी ही पुस्तके लिहिली आहेत. १९८९ ते २०१७ या काळात त्या एन बी ई आर च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. २०२३ मध्ये त्यांना ‘श्रम लिंग भेद’ संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.

     

    संशोधन :

    गोल्डिन यांनी केलेल्या संशोधनामध्ये महिलांची श्रम शक्ती, लिंग भेदानुसार कमाईतील तफावत, उत्पन्न असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि इमिग्रेशन यांसह विविध विषयांचा अभ्यास त्यांनी केला आहे. महिलांवरील ऐतिहासिक कार्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्या क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून त्यांना ओळखले जाते. विविध संशोधन पेपर्समध्ये महिलांच्या करिअर आणि कुटुंबाच्या शोधाचा इतिहास, उच्च शिक्षणातील सहशिक्षण, महिलांच्या करिअरवर आणि लग्नाच्या निर्णयांवर गर्भनिरोधक “गोळी” चा प्रभाव, लग्नानंतरचे महिलांचे आडनाव हे सामाजिक निर्देशक असून, बहुसंख्य महिला आता पदवीधर असल्याने महिलांच्या रोजगाराचे नवीन जीवनचक्र सुरु झाले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेतकरी ते औद्योगिक समाजात बदल झाल्यामुळे विवाहित महिलांचा सहभाग कमी झाला, परंतु नंतर विसाव्या शतकात, स्त्रियांच्या शिक्षणाची पातळी सतत वाढत गेली आणि त्याचबरोबर सेवा क्षेत्रामध्ये झालेली वाढ. बहुतेक उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये शिक्षणाची पातळी आता पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे. गोल्डिनने दाखवून दिले की गर्भनिरोधक गोळ्याच्या प्रवेशाने करिअर नियोजनासाठी नवीन संधी देऊन या क्रांतिकारी बदलाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

     

    संशोधनाचे महत्त्व :

    गोल्डिन यांनी महिलांच्या श्रम बाजारातील योगदानाचा शतकानुशतके पहिला सर्वसमावेशक अभ्यास सादर केला आहे. अर्थशास्त्रातील गोल्डिनचा प्रवास हा अडथळे तोडण्याची आणि क्षितिजे विस्तारण्याची कहाणी आहे. गोल्डिनने कामगार बाजार, असमानता, लिंग आणि आर्थिक इतिहास एकत्रित करून तिच्या प्रभावी कामाने पारंपारिक शैक्षणिक सीमांच्या बाहेर एक नवीन पाया रचला. औद्योगिकीकरणामुळे महिलांचा श्रम बाजारातील सहभाग कमी झाला, परंतु सेवा क्षेत्राच्या वाढीमुळे त्यात पुन्हा वाढ झाली, हे त्यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की जागतिक श्रम बाजारात महिलांचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे आणि जेव्हा त्या काम करतात तेव्हा त्या पुरुषांपेक्षा कमी कमावतात. विवाह, अपेक्षा आणि गर्भनिरोधक गोळ्या यांसारख्या घटकांनी स्त्री श्रमाच्या मागणी आणि पुरवठ्यावर कसा परिणाम केला, हे त्यांच्या संशोधनातून समोर आले. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की श्रमिक बाजारात लिंगभेद कायम राहिल्यास पुरुष आणि स्त्रिया दोघानांही नुकसान सोसावे लागते. कामगार क्षेत्रातील लिंग विषमता समजून घेण्याचा आणि त्या दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ कामगार अर्थशास्त्राच्या (आणि सर्वसाधारणपणे अर्थशास्त्र) क्षेत्रालाच आकार देत नाही तर ऐतिहासिकदृष्ट्या पुरुषप्रधान क्षेत्रात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक दीपस्तंभ म्हणूनही काम करत आहे.

    अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक २०२३ मिळविणाऱ्या गोल्डिन या तिसऱ्या महिला आहेत. स्वतःच्या बळावर अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक जिंकणारी इतिहासातील पहिली महिला म्हणून त्यांचा उल्लेख आहे.

     

    डॉ. रिता मदनलाल शेटीया

    (लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण

    November 8, 2026

    दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

    November 6, 2026

    होमिओपॅथी की मॉडर्न मेडिसिन? भाग २

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif