Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»नो व्हेईकल डे : महापौर सायकलवर निघाल्या!
    संपादकीय

    नो व्हेईकल डे : महापौर सायकलवर निघाल्या!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 21, 2026No Comments177 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन टंचाईवर मात करण्यासाठी इंधन बचत करा, त्यासाठी ई व्हेईकल वापरा, ई बाईक वापरा, अथवा दोन दोन गाड्यांचा वापर करण्याऐवजी एकाच गाडीचा वापर करा, असा संदेश भारतीय जनतेला दिला. त्यानुसार आपापल्या परीने इंधन बचतीचा फंडा प्रत्येक जण करू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले शासकीय वाहन वापरण्याऐवजी बुलेटवर आपले घर ते मंत्रालय असा प्रवास स्वतः बुलेट बाईक चालवत मंत्रालयात आले. त्याप्रमाणे जळगावच्या महापौर दीपमाला काळे या आपले शासकीय वाहन वापरण्याऐवजी ई बाईकवर त्या घरापासून महापालिकेच्या कार्यालयापर्यंत आल्या आणि हप्त्यातून एक दिवस नो व्हेईकल डे करण्यात आला. म्हणजे प्रत्येक बुधवारी नो वेहिकल डे साजरा करण्यात येणार आहे. म्हणून त्या काळात काल बुधवार रोजी आपले राहते घर ते महापालिका कार्यालय सायकलवर आल्या. महापौर स्वतः सायकलवर आल्या पण आपल्या स्टाफला त्यांनी आठवड्यातून एक बुधवारी वाहनाशिवाय कार्यालयात यावे अशी विनंती वजा सूचना केली. त्यानुसार उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे त्यांच्या निवासस्थानापासून महापालिका कार्यालयापर्यंत पायी प्रवास करून आले. आठवड्यातून एक दिवस जरी वाहन वापरणे बंद केले तर फार मोठा फरक इंधन बचतीत होऊ शकतो. महापालिका स्टाफ ऐवजी त्यांनी संपूर्ण जळगाव शहरवासीयांना एक दिवस नो व्हेईकलडे साजरा करावा, अशी विनंती केली. संपूर्ण जळगावसह शहरातील नागरिकांनी याची दखल घ्यावी आणि इंधन बचतीचा संदेश पाळावा, संपूर्ण जळगावमधील नागरिकांनी नव्हे तर त्यातील काही जणांनी जरी नो वेहिकल डे पाळला तर फार काही साध्य होईल. अलीकडे पेट्रोल पंपावर होणारी गर्दी पाहिली किंवा पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा खडखडाट पाहिला तर हा संदेश महत्त्वाचा आहे. सध्या पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ट्रक जागीच थांबून आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेती कामासाठी डिझेल लागते ते मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे. अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या रंगाच्या रांगा लागलेल्या आहेत. काही शेतकरी आपली रिकामी कॅन घेऊन सुद्धा पेट्रोल पंपावर रांगा लावत आहेत. त्यांच्या रांगा लागल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोल संपले तर ते तिथेच झोपून राहतात. असाच एक अनुभव धरणगाव जवळील पेट्रोल पंपवर आला. शेतकरी रांगा लावून बसले होते. अचानक डिझेल संपले. तेव्हा दुसरा टँकर येईपर्यंत ते शेतकरी तेथेच बसून होते. तेव्हा पेट्रोल पंप चालक चंदन पाटील यांनी या सर्व शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था केली. पेट्रोल पंप चालकाची ही माणुसकी पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. पेट्रोल अथवा डिझेलचा साठा मुबलक आहे, लोकांनी लाईन लावून वाहनांमध्ये भरून घेण्याची घाई करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले असले तरी काही मर्यादित दिवसांपूर्वीच साठा आहे असे सांगण्यात येते. जे ट्रक डिझेल विना रस्त्यावर थांबून आहेत त्याबाबत काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज अनेक ट्रक थांबून आहेत. उद्या आणखी काही ट्रक थांबतील. असे दिवसागणिक कित्येक ट्रक थांबतील? ही संख्या वाढेल यात तीळ मात्र शंका नाही. हळूहळू ट्रकचे अथवा वाहनांचे लॉकडाऊन सुरू होईल की काय? अशी भीती निर्माण होते आहे. एक दिवस असा येईल की इंधन नसल्यामुळे रस्त्यावर वाहनेच नाहीत. तर वाहनांचे आपोआप लॉकडाऊन निर्माण होईल.

    इंधन टंचाईमुळे आणि पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे इतर वस्तूंच्या भाव वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे, नव्हे तो झाला आहे. दुधाच्या किमती वाढल्या आहेत. भाजीपाला जो मार्केटमध्ये येतो तो महागला आहे. काही दिवसांनी मार्केटमध्ये येणारी वाहने येणार नाहीत, तेव्हा भाजीपाला इतर व इतर वस्तूंचे भाव आकाशाला भिडतील. पेट्रोल डिझेलचा तुटवडा अथवा भाव वाढ ही आता इतर बाबतीत परिणामकारक ठरते आहे. जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, त्या महागले आहेत. महागाई विकोपाला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हा इंधन तुटवडा एकट्या जळगाव मध्येच नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात जाणवायला लागला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे येथे सुद्धा इंधन टंचाई जाणवू लागली आहे. प्रत्येक विभागातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगांच्या रांगा दिसत आहेत. किंवा पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल शिल्लक नाही अशा पाट्या झळकत आहेत. म्हणून महापौर दीपमाला काळे यांनी आठवड्यातून एक दिवस नो वेहिकल डे पाळावा अशी विनंती वजा सूचना केली आहे. या सूचनेचे आदेश समजून प्रत्येकाने पालन करावे म्हणजे आठवड्यातून एक दिवस पेट्रोल डिझेलची बचत होईल आणि ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यांच्याकडे वाहने जास्त आहेत. त्यांनी इतर वाहने बंद ठेवून एकच वाहन चालवायला काढले तर ते फार संयुक्तिक होईल. बाईकवाले हे जर शेअरिंग मध्ये एकाच वाहनाचा उपयोग करून आलटून पालटून वापरू लागले तर ते जास्त संयुक्त ठरेल. जवळपास जायचे आहे तेथे पायी जाऊन गेले तर त्यातून फार मोठी इंधन बचत होईल. बाहेरचा प्रवास शक्यतो टाळावा किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करावा. रेल्वेद्वारे शक्यतोवर प्रवास करावा किंवा बस वाहतुकीवर प्रवास करावा. पर्यटन करणाऱ्यांनी तूर्तास आपले पर्यटन टाळावे. इंधन टंचाई दूर झाल्यावर पर्यटनाला जावे. एकंदरीत कुठल्याही प्रकारे इंधन टंचाईवर मात करण्यासाठी आपण सज्ज राहावे, म्हणजे एक चांगला संदेश इंधन टंचाई बाबत जाऊ शकतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!

    September 6, 2026

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    September 3, 2026

    महामार्ग कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif