एकदा शब्द दिला की पुन्हा मागे फिरत नाहीत

एकनाथ शिंदे यांचे पुन्हा विरोधकांवर टीकास्त्र

0

 

जळगाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते पारोळा येथील प्रचारसभेत बोलत होते. सभेत लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या आहे, सगळ्यात मोठी सभा आज इथं पारोळ्यात होत आहे. याचा मला आनंद आहे. महाविकास आघाडीच्या बकासुराविरोधात आपण आज सर्व एकत्र आलो आहोत. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, अन्यायाविरूद्ध पेटून उठणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेचं खच्चीकरण झालं. एकनाथ शिंदेंनी धाडस केलं नसतं तर आज शिवसेना आणि धनुष्यबाणही विकला असता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही होतो. ते विकासविरोधी आणि काम बंद पाडणारं सरकार होतं, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या सरकारनं घरातील वीजबिलावर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर व्हिजन महाराष्ट्र 29 हे स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं काम आहे. आपण असे अनेक शेतकरी फायद्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी फक्त फसव्या घोषणा दिल्या. गुलाबरावांच्या भाषेत सांगायचं झालं तर टांगा पलटी घोडे फरार, पण आम्ही जे केलं ते बरोबर केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही एकदा शब्द दिला की पुन्हा मागे फिरत नाहीत, आम्ही लाडक्या बहिणींना देणारे आहोत, हे सरकार देणा बँक आहे. हे सरकार हप्ते घेणारे सरकार नाही तर देणारे सरकार आहे.  एक-दोन नाही तर तब्बल पाच हप्ते आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. आमची नियत साप आहे, आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.