Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»विद्यापीठात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली
    शैक्षणिक

    विद्यापीठात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 2, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विद्यापीठात महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली

    जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी टेकडीवर झालेल्या “भजन प्रभात” या कार्यक्रमात सादर झालेल्या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. याच कार्यक्रमात भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना देखील वंदन करण्यात आले.

    विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी गांधी टेकडीवर संगीत विभागाच्यावतीने भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वैष्णव जन तो तेने कहीये, राष्ट्र वंदना, कबीरा कहे ये जग अंधा, हमको मन की शक्ती , आनंद या जीवनाचा, समय बडा बलवान, मत कर माया का अहंकार, सुहागन तीरथ करने चली, या जन्मावर या जगण्यावर, गुजरा न करो गरीबीमे, हीच अमुची प्रार्थना, जे का रंजले गांजले या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला .

    तेथे कुलगुरुं समवेत विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतल्या. या कार्यक्रमास कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु. पगारे, महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ अतुल बारेकर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, रासेयो संचालक डॉ. रोकडे, प्रा. के.पी. दांडगे, प्रा.मनसरे, प्रा. राम भावसार, प्रा. मनोज इंगोले, आदी उपस्थित होते.

    संगीत विभागाचे गीत गायन माधुरी महाजन, अनुराग जगदाळे, साहिल माहुले, प्रा.म.सु.पगारे यांनी तर साथ संगत साहिल माहुरे, प्रा.तेजस मराठे, डॉ. सागर चक्रनाराण, निवेदक खेमराज पाटील यांनी केले. सुरुवातीस कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु. पगारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोच्या विद्यार्थ्यांनी “स्वच्छता ही सेवा” या पंधरवडया निमित्त रासेयोच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परीसरातील गांधी टेकडी, ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली.

     

     

     

     

     

     

     

    Former Prime Minister of India Lal Bahadur Shastri Mahatma Gandhi Mahatma Gandhi Jayanti at North Maharashtra University
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif