जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील केंद्रिय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष व जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने दि. १६ जानेवारी २०२५ रोजी “रोजगार मेळावा २०२५” चे आयोजन करण्यात येणार आहे.
वरील रोजगार मेळाव्यासाठी विद्यापीठातील सर्व प्रशाळा आणि जळगाव जिल्हयातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व पदवीधर (PG,UG) यापूर्वी उत्तीर्ण झालेले, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात अंतीम वर्षात (PG, UG) असलेल्या विद्यार्थ्यांनी विहित पात्रता धारक विद्यार्थ्यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंक वर नाव नोंदणी करावी.
नोंदणीसाठी अंतिम दिनांक १० जानेवारी २०२५ पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठातील सेंट्रल ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल दूरध्वनी क्र. ०२५७-२२५७३४६ वर संपर्क साधावा.