विद्यापीठात व्याख्यानाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत महात्मा फुले यांची उद्योजकता या विषयावार व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रशाळेचे संचालक मा. प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पॅसिफीक कोचिंग क्लासेसचे संचालक कैलास पाटील होते. त्यांनी ‘महात्मा फुले यांची उद्योजकता’ या विषयावर व्याख्यानाची सुरूवात करुन उदयोग व उद्योजकता म्हणजे काय? अशा प्रश्नाने सैध्दांनिक भूमिका मांडली. एखादा व्यवसाय सुरू करणे म्हणजे उद्योजकता होय. उद्योजिकता म्हणजे कार्यप्रवण राहणे असाही कार्यप्रवण राहणे असाही अर्थ त्यांनी यावेळी सांगितला. महात्मा फुले यांचा परिचय करून देतांना पुण्यात येण्यापर्यंतचा ते सुरु करण्यापर्यंताचा सविस्तर प्रवास त्यांनी वर्णन करुन सांगितला. फुले हे उत्तम उद्योजक होते. त्यांनी त्यांच्या तत्कालीन काळात विविध उदयोगांना चालना दिली. सोने चांदीच्या छाप्यांची एजन्सी त्यांनी चालवली पुणे “कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी” नावाची बांधकाम कंपनी सुरु करुन साधारणत: 2000 लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. असे अनेक छोटे-मोठे सामाजिक दायित्व असणारे उदयोग फुलेंनी सुरु केले होते. महात्मा फुलेंचा आदर्श तरुणांनी घेणे गरजेचे आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म.सु.पगारे म्हणाले, महात्मा फुले यांचा ‘नीती’ या शब्दावर अधिक भर होता. महात्मा फुलेंचे कार्य हे सत्य, सचोटी, व प्रमाणिकतेवर आधारित होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा महामानव म्हणजेच महात्मा फुले त्यांच्या उद्योजकतेचे कार्यक्षेत्र अभ्यासक संशोधकांपासून उपेक्षित राहिल्याचे लक्षात येते.
व्याख्यानंतर प्रशाळेतील प्राध्यापकांनी वक्ते व अध्यक्ष यांना महात्मा फुलेंची उद्योजकता, सामाजिकता व तत्कालिन परिस्थिती यावर विविध प्रश्न विचारून व इतर विषयांवर सखोल चर्चा केली. डॉ. सुदर्शन भवरे, डॉ. दिपक खरात, कृष्णा संदानशिव, प्रतिभा गलवाडे, डॉ. प्रिती सोनी, खेमराज पाटील, जितेंद्र नाईक यांनी प्रश्न विचारून चर्चा अधिक खुलविण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी प्रशाळेतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रिती मनुचारी यांनी केले.