Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»दोन माजी महापौरांसह ‘या’ दिग्गज नगरसेवकांचा आज भाजप प्रवेश !
    जळगाव जिल्हा

    दोन माजी महापौरांसह ‘या’ दिग्गज नगरसेवकांचा आज भाजप प्रवेश !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 31, 2025Updated:October 31, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उबाठा गटाला पडणार मोठे खिंडार .. ; भाजपात आणखी इनकमिंग वाढण्याचे संकेत

    जळगाव : माजी महापौर नितीन लढ्ढा आज शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल चर्चांना उधाण आले होते. ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या खंदे समर्थकांपैकी नितीन लढ्ढा एक आहेत.


    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असून भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झाली आहे. जळगाव महानगर पालिकेवर भाजपाला एक हाती सत्ता हवी असल्याने भाजप विविध प्रकारचे ऑपरेशन करीत आहेत. महापौर पदाच्या कार्यकाळात नितीन लढ्ढा यांनी मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना दिली होती. त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर असून त्याचा भाजपाला फायदा होवू शकतो. आज सायंकाळी 4 वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होवू घातला आहे. नितीन लढ्ढा यांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

    यांचा होणार प्रवेश
    मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जी.एम. फाऊंडेशन भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह माजी महापौर जयश्री महाजन, हर्षा अमोल सांगोरे ,माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, आबा कापसे, प्रतिभा कापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, नवनाथ दारकुंडे, जाकीर पठाण, फिरोज पठाण आदींसह उबाठा गटाचे माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दै. लोकशाहीला दिली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif