दुचाकीवरून गोमांसाची वाहतूक करणारा ताब्यात

0

खिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

खिर्डी ता. रावेर येथून जवळच असलेल्या विवरा खिर्डी रोडवर दुचाकीवरून अवैध गोमांस वाहतूक करत असल्याची घटना घडली. दि. 14 रोजी सकाळच्या दरम्यान आरोपी शेख अनिस शेख अय्युब  (वय २७, रा.रसलपुर  ता.  रावेर) यास निंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतला असून वीस किलो गोमांस, लोखंडी कुऱ्हाड, मोटार सायकल जप्त केली आहे.

पो.शि.किरण जाधव निंभोरा पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीहून गु.र.नं ०६/२०२५ महा प्राणी संरक्षण अधि १९७६(सुधारित २०१५अन्वये) कलम ५(क),९(अ) प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास स.पो.नी. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.उप.पो.नी.अभय ढाकणे करीत आहे. आरोपीस रावेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

निंभोरासह परिसरामध्ये अवैध गोमास वाहतूक नेहमीचेच झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून असे प्रकार थांबवायला पाहिजेत अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली. दरम्यान सदर प्रकरणी आमदार अमोल जावळे यांनी गो हत्या बंदी कायदा अंतर्गत असे प्रकार थांबवण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.