Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»निंबाळकर शिंदे गटात जाताच मिळाली मोठी जबाबदारी
    राजकारण

    निंबाळकर शिंदे गटात जाताच मिळाली मोठी जबाबदारी

    प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 23, 2026No Comments469 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटात काल या खासदारांनी एकत्र प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्रही दिले. 6 खासदार एकाच वेळी शिवसेना शिंदे गटातून गेल्याने मोठे खिंडार ठाकरे गटाला पडले. व्हिप जारी करूनही पक्षाच्या बैठकीला 6 खासदार हजर झाले नसल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली.

    शिवसेना ठाकरे गटाकडून हा 6 खासदारांवर कारवाई केली जाणार आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत थेट या 6 खासदारांच्या मतदार संघात दाैरा करण्याचा निर्णय घेतला. मोठे बदल या मतदार संघात होणार असल्याचे स्पष्ट आहे. दोन्ही पक्षांकडून काही मोठे निर्णय घेतले जात आहेत. ओमराजे निंबाळकरही शिवसेना शिंदे गट धाराशिवमध्ये मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

    यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. त्यांनी थेट मोठे आदेश दिली आहेत. शिवसेनेची धाराशिवची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. आता नवीन पुनर्बांधणी पक्षाकडून केली जाईल. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत खांदेपालट होणार अशी शक्यता आहे.

    धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली. लवकरच पक्ष पुनर्बांधणी करून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला.

    ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यादरम्यान त्यांनी मोठा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर कोणत्याही प्रकारची टीका करणार नसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. पण संजय राऊत यांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांच्यावर सतत टीका केली जात आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाला मोठी ताकद धाराशिव जिल्ह्यात मिळाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif