Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»निंबा दवी धरण शंभर टक्के भरले
    जळगाव जिल्हा

    निंबा दवी धरण शंभर टक्के भरले

    संरक्षक भिंतीचा भाग खचला; मात्र धरण सुरक्षित
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 2, 2026No Comments652 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी भोनक नदीच्या उगमस्थानी असलेले निंबादेवी धरण शंभर टक्के भरले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ३०६ हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

    दरम्यान, धरणाच्या सांडव्याच्या पायऱ्यांलगत असलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग खचल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शाखा अभियंता वर्षा चव्हाण यांनी धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. भिंतीचे नुकसान हे गेल्या वर्षीचे असून दुरुस्तीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो लवकरच मंजूर होऊन आवश्यक काम हाती घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    निंबादेवी धरणाची पाणीसाठा क्षमता २.४२८ दलघमी असून सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या प्रकल्पाचा लाभ नायगाव, चुंचाळे, सावखेडा सिम, दहिगाव, शिरसाळ, साकळी, नावरे आणि वडोदे परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे.

    दरम्यान, धरणाच्या सांडव्यातून वाहणारे अतिरिक्त पाणी नागादेवी पाझर तलावाकडे वळविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. असे झाल्यास नागादेवी पाझर तलावही दरवर्षी भरून दहिगाव, सावखेडा सिम, मोहराळा आदी गावांतील भूजल पातळी वाढण्यास आणि सिंचनासाठी मोठा फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif