आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा ? या संकेतस्थळांवर पहा निकाल

0

मुंबई ;- आता राज्यातील विद्यार्थ्यांना 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर (SSC Results 2023) प्रतीक्षा आहे 10 वी च्या निकालाची. 10 वी बोर्डाचा निकाल कधी लागणार?

याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार दि. 7 जून पर्यंत 10 वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल कुठे आणि कसा पाहायचा याबाबत जाणून घेवूया…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा घेण्यात आली होती.

इथे पहा निकाल –
1. www.mahresult.nic.in
2. https://sscresult.mkcl.org
3. https://ssc.mahresults.org.in
4. www.mahresult.nic.in
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

1. दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
2. दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. (SSC Results 2023)
3. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
4. दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.