Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जिल्हाभरात पोलिसांकडून नाईट कोम्बिंग ऑपरेशन!
    गुन्हे वार्ता

    जिल्हाभरात पोलिसांकडून नाईट कोम्बिंग ऑपरेशन!

    अवैध वाहतूक, शस्त्रांची हालचाल रोखण्यासाठी पाऊल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 4, 2026No Comments141 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची हालचाल रोखण्यासाठी मोठी धडक कारवाई हाती घेतली. रविवारी रात्री राबविण्यात आलेल्या ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ अंतर्गत शहरातील विविध प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करून तब्बल 70 खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून सुमारे 20 हजार रुपयांचा थकीत दंडही वसूल करण्यात आला.

    ही विशेष मोहीम दोन टप्प्यांत राबविण्यात आली. रात्री 8 ते 12 आणि पहाटे 4 ते 7 या वेळेत पोलीस पथकांनी शहरातील आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, भुसावळ नाका आणि अमळनेर स्टॉप (पारोळा) यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली. या कारवाईत आरसीपीच्या चार प्लाटून्स, गुन्हे शोध पथकाच्या चार प्लाटून्स तसेच शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तपासणीदरम्यान सर्व बसेसची काटेकोर झडती घेण्यात आली. चालक आणि वाहकांना कोणत्याही प्रकारचे अवैध अंमली पदार्थ, विनापरवाना शस्त्रास्त्रे किंवा प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक न करण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या. यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमधील फायर एक्स्टिंग्विशर, इमर्जन्सी एक्झिट या सारख्या सुरक्षा सुविधांचीही पाहणी करण्यात आली.

    लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दोन चालक नियम अनिवार्य असल्याचे पुन्हा अधोरेखित करत त्याचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक व मालकांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला. ई-चलन प्रणालीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी करताना अनेक वाहनांवर प्रलंबित दंड आढळून आला, जो तत्काळ वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक (जळगाव) संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif