दहशतवाद्यांना मदत, PFI संघटनेवर ED आणि NIA चे छापे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केरळमध्ये (Kerala) स्थापन झालेली मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 10 हून अधिक राज्यांमधील ठिकाणांवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) छापे टाकले आहेत. दहशतवादी कृत्यांसाठी पैसा पुरवणे आणि प्रशिक्षण दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच, 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे. महाराष्ट्र, यूपी, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूसह अनेक राज्यात कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्रातील अनेक शहरात छापेमारी

दहशतवादी कृत्यांना मदत केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील अनेक शहरात एनआयएकडून छापेमारी सुरु आहे. केरळमध्ये स्थापन झालेली मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) महाराष्ट्रातील ठिकाणांवर छापेमारीत सुरु आहे. पुण्यासह नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना, मालेगाव, परभणी, कोल्हापूर या शहरात एनआयए, एटीएस गुप्तचर यंत्रणा कारवाई करत आहे.

PFI संघटनेची तीन लाख फॅमिली अकाऊंट

PFIकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या वादग्रस्त संघटनेची तीन लाख फॅमिली अकाऊंट आहेत. या खात्यांमध्ये फॅमिली मेन्टेनन्सच्या नावाखाली कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातून 500 कोटी रुपये आले आहेत, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.