Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकार्थ»पुढच्या महिन्यात पेट्रोल १५० तर डिझेल १७० रुपये लिटर?
    लोकार्थ

    पुढच्या महिन्यात पेट्रोल १५० तर डिझेल १७० रुपये लिटर?

    काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा : चर्चांना उधाण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 28, 2026No Comments414 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी इंधनाचा साठा संपल्याने पंप तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अश्यात विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

    याच परिस्थितीवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी धक्कादायक अंदाज व्यक्त केला. “पुढील एक ते दीड महिन्यात पेट्रोलचा दर १५० रुपये तर डिझेलचा दर १७० रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊ शकतो,” असा दावा त्यांनी केला. देशातील आर्थिक परिस्थिती आणि सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी म्हटलं की, “ज्या पद्धतीने देश चालवला जात आहे, त्यावरून देशाला खड्ड्यात घालण्याचं काम सुरू आहे. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे.”

    सरकारकडून इंधन तुटवडा नसल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. “केंद्रीय मंत्री आणि सरकार सातत्याने तुटवडा नसल्याचं सांगत आहेत. मग पेट्रोल पंपांवर डिझेल देताना वाहनाचं आरसी बुक का तपासलं जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विशेषतः शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल घेताना कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याने परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला.

    राज्यातील ग्रामीण भागात या टंचाईचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. शेतीची कामे, मालवाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक यावर परिणाम होत असून, अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागत आहे. वाढत्या इंधन दरांमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू शकतात, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

    दरम्यान, सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात इंधन दरवाढ आणि टंचाईचा मुद्दा राज्याच्या राजकारणात अधिक तापण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif